For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण

06:27 AM Mar 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा निवडणुकीची तयारी जवळपास पूर्ण
Advertisement

केंद्रीय निवडणूक आयोगाची पूर्वतयारी आढावा घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. निवडणूक आयोग 15 मार्चच्या आसपास निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. केंद्रीय निवडणूक आयोग उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये एक किंवा दोन टप्प्यात आणि उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये त्याहून जास्त टप्प्यात निवडणुका घेईल, असे समजते.

Advertisement

चालू महिन्याच्या मध्यात म्हणजे 13 ते 15 मार्चदरम्यान लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम अंतिम करण्यावर भर दिलेला असतानाच आता विविध राजकीय पक्षांच्या बैठकांचा सपाटाही वाढला आहे. याचदरम्यान लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोग एकामागून एक राज्यांचा दौरा करत आहे. प्रशासकीय आढावा घेण्याबरोबरच निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरू असल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांवर 6 ते 7 टप्प्यात मतदान होऊ शकते. उत्तर प्रदेशात एप्रिल आणि मे महिन्यात मतदान होणार आहे. हरियाणातील 10 जागांवर एकाच टप्प्यात मे महिन्यात मतदान अपेक्षित आहे. पंजाबमधील लोकसभेच्या 13 जागांवर मे महिन्यात एकाच टप्प्यात मतदान होण्याची शक्मयता आहे. तथापि, कायदा आणि सुव्यवस्थेचे अंतिम मूल्यांकन केल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमध्ये दोन टप्प्यांचा पर्यायही ठेवला जाऊ शकतो.

डोंगराळ राज्य हिमाचल प्रदेशातील 4 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार असून मतदानाची तारीख मे महिन्यात असेल. उत्तराखंडमधील 5 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार असून एप्रिल महिन्यात मतदान होण्याची शक्मयता आहे. जम्मू-काश्मीर या डोंगराळ राज्यातील लोकसभेच्या 5 जागांसाठी 3 ते 5 टप्प्यात मतदान होणार असून मतदानाच्या तारखा एप्रिल आणि मे दरम्यान असतील. लडाखमध्ये एकच मतदारसंघ असून एकाच टप्प्यात मतदान होऊ शकते. राजस्थानमधील 25 जागांवर एक किंवा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दिल्लीतील लोकसभेच्या 7 जागांवर एकाच टप्प्यात मतदान घेतले जाऊ शकते. राज्यांचा दौरा करून निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे.

ठिकठिकाणी मतदान जनजागृती मोहीम

लोकसभा निवडणुकीत मतदारांचा मोठा सहभाग लक्षात घेऊन निवडणूक आयोगाच्यावतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मतदार यादीत नावे जोडण्यासंबंधीची माहिती दिली जात आहे. तसेच लोकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. राज्य निवडणूक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. जनजागृतीसोबतच शहरातील मतदान केंद्रे शून्य कचरामुक्त करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्व प्रभागातील स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक आणि मंडळ कर्मचारी यांच्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. सार्वजनिक चौकांमध्ये भाषणे व प्रदर्शन फलकांच्या माध्यमातून मतदानाच्या हक्काचे महत्त्व समजावून सांगितले जात आहेत.

Advertisement
Tags :

.