For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चारधाम यात्रेची पूर्वतयारी जोरात

06:03 AM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
चारधाम यात्रेची पूर्वतयारी जोरात
Advertisement

19 एप्रिलला प्रारंभ : गंगोत्री, यमुनोत्रीचे दरवाजे उघडणार

Advertisement

► वृत्तसंस्था/ देहराडून

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. यावर्षी यात्रेची सुरुवात 19 एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमुनोत्री धामांनी होईल. यानंतर बुधवार, 22 एप्रिल रोजी केदारनाथ धामचे दरवाजे भक्तांसाठी उघडतील आणि गुरुवार, 23 एप्रिल रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील. भक्तांना या तारखांनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन आगाऊ करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यात्रेला होणारा प्रारंभ आता पंधरवड्यावर आल्याने प्रशासनाकडून केली जाणारी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

Advertisement

चारधाम यात्रा केवळ एक आध्यात्मिक अनुभवच देत नाही, तर पर्वतीय मार्ग, बर्फाच्छादित शिखरे आणि नद्यांच्या चित्तथरारक दृश्यांनी यात्रेकरूंना मंत्रमुग्ध करते. या यात्रेदरम्यान भक्त केवळ धार्मिक विधी आणि पूजाच करू शकत नाहीत, तर ट्रेकिंग आणि निसर्गरम्य दृश्यांचा आनंदही घेत असल्यामुळे दरवर्षी भाविकांचा उत्साह आणि आकडा वाढताना दिसत आहे. ट्रेकिंगच्या मार्गांमुळे केदारनाथ धामचा ट्रेक विशेषत: आव्हानात्मक असल्यामुळे वेळेवर तयारी करणे आवश्यक आहे.

नोंदणी आवश्यक

चारधाम यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूंसाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केल्याने यात्रेकरूंना हेलिकॉप्टर सेवा, मार्गाची माहिती आणि धार्मिक स्थळांवर प्राधान्याने प्रवेश मिळतो. उत्तराखंड राज्य सरकारने अधिक सुरक्षित आणि संघटित यात्रेसाठी ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. प्रवासादरम्यान हलके आणि उबदार कपडे, ट्रेकिंग शूज, प्रथमोपचार किट, पाण्याची बाटली, सनक्रीन, रेनकोट आणि मोबाईल चार्जर सोबत बाळगणे महत्त्वाचे आहे. तसेच, प्रवासासाठी फोटो ओळखपत्र आणि नोंदणीची प्रत सोबत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.