कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी सुरू

12:23 PM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तर-दक्षिणेसाठी अधिकारी नियुक्त : राज्य निवडणूक आयोगाकडून आदेश जारी

Advertisement

पणजी : राज्यात जिल्हा पंचायतीसाठी लवकरच होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने उत्तर आणि दक्षिण गोव्यासाठी निवडणूक अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यासंबंधी आदेश काल जारी करण्यात आला आहे. आदेशानुसार उत्तर गोव्यातील हरमल, मोरजी, धारगळ, तोरशे, या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून पेडणे उपजिल्हाधिकारी आणि आणि उपविभागीय अधिकारी तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून पेडणे मामलेदार काम पाहणार आहेत.

Advertisement

शिवोली, कोलवाळ, हळदोणे, शिरसई आणि अंजुणे या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून बार्देश उपजिल्हाधिकारी आणि आणि उपविभागीय अधिकारी-1 तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून बार्देश मामलेदार काम पाहणार आहेत.

कळंगूट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स या या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून बार्देश उपजिल्हाधिकारी आणि आणि उपविभागीय अधिकारी-2 तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून बार्देश संयुक्त मामलेदार-1 काम पाहणार आहेत.

सांताक्रूज, ताळगाव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून तिसवाडी उपजिल्हाधिकारी आणि आणि उपविभागीय अधिकारी तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तिसवाडी मामलेदार काम पाहणार आहेत.

लाटंबार्शे, कारापूर सर्वण, मये, पाळी या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून डिचोली उपजिल्हाधिकारी आणि आणि उपविभागीय अधिकारी तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून डिचोली मामलेदार काम पाहणार आहेत.

होंडा, केरी, नगरगांव, या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून सत्तरी उपजिल्हाधिकारी आणि आणि उपविभागीय अधिकारी तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सत्तरी मामलेदार काम पाहणार आहेत.

दक्षिण गोवा

उसगांव गांजे, बेतकी खांडोळा, कुर्टी, वेलिंग प्रियोळ या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून फोंडा उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी (एसडीओ)/ उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून फोंडा मामलेदार काम पाहणार आहेत.

कवळे, बोरी, शिरोडा, या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून फोंडा उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी (एसडीओ)/ उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून फोंडा संयुक्त मामलेदार-1 काम पाहणार आहेत.

राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून सासष्टी उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी-1 (एसडीओ-1) तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सासष्टी संयुक्त मामलेदार-1 काम पाहणार आहेत.

दवर्ली, गिर्दोळी,  कुडतरी, नावेली, या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून सासष्टी उपजिल्हाधिकारी आणि एसडीएम-2/ उपविभागीय अधिकारी-2 (एसडीओ-2) तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सासष्टी मामलेदार काम पाहणार आहेत.

सावर्डे, धारबांदोडा या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून धारबांदोडा उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी (एसडीओ)/ उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून धारबांदोडा मामलेदार काम पाहणार आहेत.

रिवण या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून सांगे उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी (एसडीओ)/ उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सांगे मामलेदार काम पाहणार आहेत.

शेल्डे, बार्शे या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून केपे उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी (एसडीओ)/ उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून केपे मामलेदार काम पाहणार आहेत.

खोला, पैंगिण या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून काणकोण  उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी (एसडीओ) उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काणकोण मामलेदार काम पाहणार आहेत.

सांकवाळ आणि कुठ्ठाळी या मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकारी म्हणून मुरगांव वास्को उपजिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी (एसडीओ)/ उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम), तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून मुरगांव वास्को मामलेदार काम पाहणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article