मतमोजणीची तयारी पूर्ण
प्रशासकीय यंत्रणा सज्ज : उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी सर्वांचे लक्ष
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हयातील विधानसभेच्या दहा जागेसाठी बुधवारी मतदान झाले. मतदारांनी भरभरुन मतदान केले असून उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे.
जिह्यातील दहा मतदारसंघातील मतमोजणी केंद्रे अशी -
चंदगड- पॅव्हेलियन हॉल गांधीनगर, नगरपरिषद, गडहिंग्लज
राधानगरी- तालुका क्रीडा संकुल, जवाहर बाल भवन, गारगोटी
कागल-जवाहर नवोदय विद्यालय, सांगाव रोड, कागल
कोल्हापूर दक्षिण- व्ही.टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, राजारामपुरी, कोल्हापूर करवीर शासकीय धान्य गोदाम क्र. डी.रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर- शासकीय धान्य गोदाम, क्र. ए. रमणमळा कसबा बावडा, कोल्हापूर
शाहूवाडी-जुने शासकीय धान्य गोदाम-पश्चिमेकडील बाजू भाग-ब, तहसिल कार्यालयाशेजारी,शाहूवाडी
हातकणंगले -शासकीय धान्य गोदाम- नंबर 2, हातकणंगले.
इचलकरंजी- राजीव गांधी सांस्कृतिक भवन, कापड मार्केटसमोर, इचलकरंजी
शिरोळ- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील आवारामध्ये (तळ मजला)