अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा : वारणा परिवारातर्फे आनंदोत्सवाची तयारी अंतिम टप्यात
कोडोलीसह वारणा परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
वारणानगर प्रतिनिधी
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर निर्माण केलेल्या मंदिराच्या लोकार्पन सोहळ्या निमीत्त वारणा परिवारातर्फे आयोजीत केलेल्या आनंदोत्सवाची तयारी अंतीम टप्यात आली असून कोडोलीसह वारणा परिसरातील गावात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची स्थापना, प्राणप्रतिष्ठा या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या चित्रफीतीवर दाखवण्यात येणार आहे पूजा अभिषेक तसेच भजन स्त्रोत्रपठण होणार आहे दुपारी राम मंदिर ते वारणा महाविद्यालय पर्यन्त भव्य पालखी,रथोत्सव सोहळा होणार असून शंख, डमरू यासह ११ प्रकारच्या विविध पारंपारिक वाद्यावर ५ हजार मुलाचे नृत्य या सोहळ्यात होणार असून पन्नास हजार रामभक्तांची बैठक व्यवस्था केली आहे विविधरंगी आतषबाजी तसेच प्रभू श्रीराम यांच्या ७२ फूटी मूर्तीसमोर महाआरती ने या सोहळ्याची सांगता होणार आहे.
कोडोली ता. पन्हाळा येथील छत्रपती चौकात ग्रामपंचायत व विविध संघटनाच्या माध्यमातून दुपारी दोन वाजता महाआरती छत्रपती चौक ते सर्वोदय चौक पर्यन्त श्रीराम प्रभूचा पालखी व रथोत्सव सोहळा पारंपारिक वाद्याच्या गजरात तसेच विविध वेशभूषेत भूषेत निघणार असून कारसेवक प्रमोद कल्लांपा सगरे यांचा सत्कार व प्रसाद वाटप करण्यात येणार असून सरपंच भारती पाटील, उपसरपंच प्रविण जाधव, ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण, सर्व सदस्य तसेच विविध संघटना ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार असल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, राजेंद्र कापरे, प्रकाश पाटील,मोहन पाटील यानी पत्रकार परिषदेत माहिती देवून घरोघरी तसेच मंदिराच्या प्रागणात रांगोळी रात्री दिपोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रभू श्रीराम मूर्ती स्थापने निमित्त वारणा परिसरातील प्रत्येक गावात मंदिरात विधिवत पूजा तसेच संकल्प पूर्तीच्या अक्षदाने पूर्णाहुती करण्यात येणार असून विद्युत रोषणाई भगवे ध्वज गुढी उभारणे प्रसाद वाटप असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.