महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तयारी पूर्ण, प्रतीक्षा मतदानाची

10:47 AM Nov 19, 2024 IST | Radhika Patil
Preparations complete, waiting for voting
Advertisement

आज मतदान पथकाचे तिसरे प्रशिक्षण : पथके केंद्रावर होणार रवाना

Advertisement

कोल्हापूर : 
विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हयातील दहा जागासाठी 121 उमेदवार रिंगणात आहेत. तर 33 लाख मतदार आहेत.प्रशासनाकडून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. मतदारांनी मतदान करण्यासाठी बाहेर पडून मतदानाचा आपला पवित्र हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

Advertisement

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जिल्ह्यातील निवडणूकीच्या प्रक्रियेसाठी दहा निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. पाच सामान्य निवडणूक निरीक्षक आहेत. 46 एसएसटी पथके आहेत.जिल्हयात 3,452 मतदान केंद्रे आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून विविध पथकांकडून 12 कोटी 93 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 31 लाख 37 हजाराची रोकड आहे. सी-व्हिजिल अॅपवर 56 तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी 18 तक्रारीमध्ये तथ्य आढळले नाही. 36 तक्रारीवर कारवाई केली आहे. आचारसंहिता भंगाचे 21 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 8 दखलपात्र आहेत तर 13 अदखलपात्र आहेत. सर्व ईपिक कार्डाचे वाटप झाले आहे. गृहमतदान 4,430 झाले आहे. तर नोंद झालेल्या गृहमतदानापैकी 207 जणांचे मतदान झाले नाही.

सर्व मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. क्रिटिकल मतदान केंद्रावर वेब कास्टिंगची व्यवस्था केली आहे. ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये असून आज (दि 19) मतदान पथकाचे तिसरे प्रशिक्षण होऊन पथके मतदानाच्या साहित्यासह मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. सर्व मतदान केंद्रावर वेब कॅमेऱ्यांचा वॉच राहणार आहे. या निवडणूकीच्या प्रक्रियेत 537 वाहने वापरण्यात येणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी मतमोजणी कर्मचाऱ्यांची दुसरी सरमिसळ आणि 23 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजता तृतीय सरमिसळ होणार आहे. जिल्ह्यात 80 टक्के पेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे 20 नोव्हेंबर रोजी मतदारांनी मतदानासाठी यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, निवडणूक उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन आडसूळ उपस्थित होते.

जिल्ह्यातील दहा जागांसाठी 121 उमेदवार
सुमारे 33 लाख मतदार
मतदान केंद्रे- 3,452

ईव्हीएम मशीन-
बॅलेट युनिट-7659
कंट्रोल युनिट-4209
व्हीव्हीपॅट- 4554

मनुष्यबळ-
नोडल अधिकारी -23
क्षेत्रीय अधिकारी-452
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी-3450
मतदान पथकातील आवश्यक मनुष्यबळ- (20 टक्के राखीव समाविष्ट करुन) 16560
सद्या उपलब्ध मनुष्यबळ- 19,865

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article