For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : महापालिकेत तयारी युद्धपातळीवर; महापौर दालनासह सभागृह सज्ज

05:22 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   महापालिकेत तयारी युद्धपातळीवर  महापौर दालनासह सभागृह सज्ज
Advertisement

                               महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण

Advertisement

कोल्हापूर : महानगरपालिकेत महापौर, उपमहापौर निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होताच महापालिकेत महापौर दालनासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या दालनांसाठी तयारी सुरू झाली आहे. शुक्रवारी ६ रोजी महापौर, उपमहापौर निवड होणार आहे. त्यासाठी सभागृहाच्या नूतनीकरणाचे कामही युद्धपातळीवर प्रशासनाकडून सुरू झाले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महापौर आरक्षण आणि त्यानंतर निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता होती. महापौर आरक्षण जाहीर होताच प्रशासनाने महापौर कार्यालयाच्या स्वच्छता आणि दुरूस्तीला गतीने सुरूवात केली, आता महापौर दालनाचे काम पूर्ण झाले आहे.उपमहापौर आणि गटनेत्यांच्या दालनासाठी प्रशासनाकडून हालचालीसुरू झाल्या आहेत. यापुर्वीच उपायुक्तांना विभागीय कार्यालयात हलवण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेतील त्यांच्या खोल्या आता पदाधिकाऱ्यांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. उपायुक्तांनी विभागीय कार्यालयांतूनच कारभार पाहण्याच्या सूचना प्रशासक, आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या महापालिकेच्या मुख्य इमारतीतील कार्यालये असलेल्या खोल्यांचा वापर आता पदाधिकाऱ्यांच्या दालनासाठी केला जाणार आहे.

Advertisement

दरम्यान, सोमवारी महापौर, उपमहापौर पदासाठी महायुती, महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल झाल्याने उत्सुकता वाढली आहे. शुक्रवारी, ६ रोजी महापौर निवड होणार आहे. त्यापुर्वी सभागृहाचे नूतनीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यामध्ये सभागृहातील छताचेसिलिंग बदलण्यात येत आहे. तसेच८१ नगरसेवक आणि अधिकारी मिळून पुर्वीच्या सभागृहात ९६ खुर्चा होत्या. आता नव्या सभागृहात १०१ खुच्र्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार काम सुरू झाले आहे.
सभागृहातील खुच्र्यांचे कुशन्सही बदलण्यात येत आहे.

सभागृहाची रंगरंगोटीही सुरू झाली असल्याचे पहायला मिळत आहे. सभागृहातील जुने दिवे बदलण्यात येत आहे. वायरिंगही बदलण्यात येत आहे. सभागृहातील प्रकाशडी वाढवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. गुरुवारपर्यंत महापालिकेतील सभागृहाचे काम पूर्ण होणार आहे. शुक्रवारी या नूतनीकरण केलेल्या सभागृहातच महापौर, उपमहापौर निवडीसाठीजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक डोणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Advertisement
Tags :

.