For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवालांच्या जामिनावर विचार करण्याची तयारी

06:02 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवालांच्या जामिनावर विचार करण्याची तयारी
Advertisement

सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी सुनावणी : अटकेसंबंधीच्या याचिकेवर तातडीने निर्णय अशक्य

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम जामिनासाठीही प्रयत्न चालवले आहेत. यासंबंधी सर्वोच्च न्यायालय त्यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी करण्यास राजी झाले आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 7 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्याची तयारी दर्शवली असून दोन्ही पक्षांना अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरील युक्तिवादासाठी तयार राहण्यास सांगितले आहे.

Advertisement

केजरीवालांच्या याचिकेवर मंगळवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली आहे. या सुनावणीमध्ये निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याच्या निर्णयावर सर्व पक्षकारांचे युक्तिवाद ऐकून निर्णय दिला जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. जामीन देणार की नाही यावर सध्या काहीही बोलत नाही. जामीन मंजूर झाल्यास काय अटी असू शकतात, याचे उत्तर सर्व पक्षकारांना द्यावे लागणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्याच्या शक्मयतेचा विचार करेल, असे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सांगितले. तसेच केजरीवाल यांची अटक योग्य आहे की अयोग्य यासंबंधीच्या दाव्यावर तातडीने निर्णय देणे अशक्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी दिल्लीतील मद्य धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी अटक करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयांकडून दिलासा न मिळाल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Advertisement
Tags :

.