For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जम्मूसाठी विशेष सुरक्षा योजनेची तयारी

06:34 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
जम्मूसाठी विशेष सुरक्षा योजनेची तयारी
Advertisement

485 किलोमीटरचा परिसर दहशतवाद्यांपासून सुरक्षित ठेवण्याची मोहीम

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू/नवी दिल्ली

पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मूतील 485 किमीच्या परिसरात पाकिस्तानातून दहशतवाद्यांची घुसखोरी अनेकदा पाहायला मिळते. हा परिसर घनदाट जंगले आणि डोंगराळ भागांनी वेढलेला असल्यामुळे सीमापार बोगद्यांसाठी हे संवेदनशील क्षेत्र आहे. आता या भागात कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद कारवाया झाल्यास दहशतवादी सुरक्षित राहणार नाहीत. केंद्र सरकारने जम्मूसाठी सुरक्षित सुरक्षा योजना तयार केली आहे.

Advertisement

जम्मूमधील सुरक्षा भक्कम करण्यासाठी सुरक्षा दलाने स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपसह (एसओजी) 75 हून अधिक विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यानुसार तेथे ग्राम संरक्षण समित्यांना (व्हीडीसी) व्यावसायिकरित्या वापरल्या जाणाऱ्या आणि इतर अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे नियमित प्रशिक्षण दिले जाईल. यातून घडणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून बोगद्यांवर अधिक लक्ष दिले जाणार असून बीएसएफची तैनातीही वाढवण्यात येणार आहे.

जम्मूतील लोकांमध्ये अधिकाधिक जागृती निर्माण करण्यासाठी सुरक्षा दल आणि प्रशासन संयुक्तपणे काही मोहिमा राबविणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी गावकऱ्यांच्या वैयक्तिक फोनवरून हॉटस्पॉट कनेक्शनचा वापर करून पाकिस्तानमधील त्यांच्या हँडलरला व्हीओआयपी (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) कॉल करत असल्यामुळे आता गावकऱ्यांना इंटरनेट हॉटस्पॉट किंवा वायफाय पासवर्ड अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका असे समजावून सांगितले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.