For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महापौर-उपमहापौर निवडणुकीची तयारी

11:23 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
महापौर उपमहापौर निवडणुकीची तयारी
Advertisement

गुरुवारी सकाळी 9 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात

Advertisement

बेळगाव : महापौर-उपमहापौर निवडणूक गुरुवार दि. 15 रोजी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या तयारीला कौन्सिल विभागाचे कर्मचारी लागले आहेत. सोमवारी सभागृहाची स्वच्छता करण्यात आली. तसेच आसनांच्या ठिकाणी संबंधित नगरसेवक व लोकप्रतिनिधींचे नामफलक ठेवण्यात आले. महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर झाल्यानंतर कौन्सिल विभागाने आपली तयारी सुरू केली आहे. सर्व नगरसेवकांना नोटिसा दिल्या आहेत. याचबरोबर इतर कागदपत्रांचीही तयारी पूर्ण केली आहे. एकूण 58 नगरसेवक याचबरोबर आमदार, खासदार, विधान परिषद सदस्य या सर्वांचे नामफलक ठेवण्यात येत आहेत. महापालिकेने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून गुरुवारी सकाळी 9 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. महापौरपद अनुसूचित महिलेसाठी आरक्षित आहे. तर उपमहापौरपद सर्वसामान्यांसाठी आहे. त्यामुळे उपमहापौर पदासाठीच अधिक चुरस निर्माण झाली आहे. सध्या भाजपची सत्ता असून भाजपचाच महापौर-उपमहापौर होण्याची शक्यता आहे. नूतन आयुक्त राजश्री जैनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.