For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘इडली’साठी होणार प्रीमियर लीग

06:38 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘इडली’साठी होणार प्रीमियर लीग

आयपीएलसाठी आनंद महिंद्रांचा प्लॅन

Advertisement

सध्या क्रिकेटच्या आयपीएलचा ज्वर वाढला आहे. याच आयपीएलशी संबंधित एक मजेशीर ट्विट आनंद महिंद्रा यांनी केला आहे. यात त्यांनी भारतीय रचनात्मकतेचे कौतुक केले आहे. तसेच या संडे मॉर्निंग आयपीएलला हायेस्ट रेटिंग मिळेल, मी संडेसाठी सीझन तिकिट बुक केल्याचे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

या आयपीएलचे क्रिकेटशी कुठलेच देणेघेणे नाही. तर येथे इडली प्रीमियर लीगचे आयोजन होत आहे. वर्ल्ड इडली डे निमित्त चेन्नईतील गीथम नावाच्या रेस्टॉरंटकडून याचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

ही इडली प्रीमियर लीग 22 मार्चपासून सुरू झाली असून 7 एप्रिलपर्यंत तिचे आयोजन होणार आहे. आनंद महिंद्रा यांनी स्वत:च्या चाहत्यांसोबत याच आयपीएलचे छायाचित्र शेअर केले आहे. महिंद्रा यांची पोस्ट असलयाने यावर कॉमेंट्सचा महापूरच आला आहे.

Advertisement

युजर्सनी गीथम यांच्या या कल्पनेला पसंती दर्शविली आहे. तसेच कुठलीही कंपनी असो किंवा आउटलेट त्यांना इतकेच क्रिएटिव्ह असायला हवे असे त्यांनी म्हटले आहे. आनंद महिंद्रा यांनी हे छायाचित्र शेअर केले असल्याने निश्चितच याचे आयोजन करणारे रेस्टॉरंट विशेष असावे असे एका युजरने नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
×

.