प्रेमा रावतचे टी-20 मध्ये 14 चेंडूत अर्धशतक
वृत्तसंस्था, पुणे
येथे सुरू असलेल्या वरिष्ठ महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात उत्तराखंडचे प्रतिनिधीत्व करताना भारताच्या अष्टपैलू प्रेमा रावतने केवळ 14 चेंडूत जलद नाबाद अर्धशतक झळकविले.
या सामन्यात 24 वर्षीय प्रेमा रावतने 4 षटकार आणि 6 चौकारांसह 14 चेंडूत नाबाद अर्धशतक झळकविले. या कामगिरीमुळे उत्तराखंडने हा सामना 89 धावांनी जिंकला. महिलांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकची कर्णधार फातिमा सनाने झिम्बाब्वे संघाविरुद्ध 15 चेंडूत जलद अर्धशतक नोंदविण्याचा विक्रम केला आहे. प्रेमाप्रमाणेच इंग्लंडच्या मारी केली तसेच ऑस्ट्रेलियाच्या लॉरा हॅरीसने राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत 15 चेंडूत अर्धशतके झळकविण्याचा पराक्रम केला होता. उत्तराखंडने 20 षटकांत 2 बाद 187 धावा जमविल्या. या सामन्यात प्रेमा रावतने गोलंदाजीमध्ये 12 धावांत 2 बळीही मिळविले.
