For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रेमसिंग तमांग दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री

06:41 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रेमसिंग तमांग दुसऱ्यांदा  सिक्कीमचे मुख्यमंत्री
Advertisement

अन्य आठ मंत्र्यांनाही राज्यपालांनी दिली शपथ

Advertisement

वृत्तसंस्था/ गंगटोक

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे (एसकेएम) अध्यक्ष प्रेमसिंग तमांग यांनी सोमवारी सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तमांग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री बनण्याची ही सलग दुसरी वेळ आहे. सिक्कीममधील पालजोर स्टेडियमवर शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी तमांग यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तमांग यांच्यासह आठ नवनिर्वाचित आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. सिक्कीमचे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रेमसिंग तमांग यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

सिक्कीममध्ये यावषी एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या होऊन 2 जूनला निकाल जाहीर झाला. प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्वाखाली एसकेएमने राज्यातील 32 पैकी 31 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत तमांग यांनी ज्या दोन जागांवर निवडणूक लढवली त्या दोन्ही जागा जिंकल्या. सोरेंग-चकुंग आणि रेनॉक या जागा जिंकून तमांग यांनी लोकांमध्ये आपली मजबूत पकड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Advertisement

.