8 वर्षांनी प्रीति झिंटा करणार कमबॅक
वाइब’ चित्रपटात साकारणार भूमिका
ओटीटीच्या काळात कलाकार आता नव्या प्रकारच्या भूमिका साकारत असून नव्या प्रोजेक्ट्समध्ये काम करत आहेत. तर कलाकार आता मोठ्या पडद्यावरुन हटत ओटीटीवर स्वत:चे चित्रपट अन् सीरिज घेऊन येत आहेत. आता एक नवा चित्रपट येत असून यात बॉलिवूडची गुणवान अभिनेत्रीचे पुनरागमन होणार आहे. वाइब या चित्रपटात प्रीति झिंटा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट कुणाल खेमू आणि चिराग निहलानीकडून निर्माण करण्यात आला आहे. तर चित्रपटात स्पर्श श्रीवास्तव, वंशिका धीर मुख्य भूमिकेत असणार आहेत. वाइब ही दोन मित्रांची कहाणी असून ते अजाणतेपणी एका अशा धोकादायक स्थितीत अडकतात, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते.
अमेझॉन एमजीएम स्टुडिओजने स्वत:चा हाय-स्टेक्स अॅक्शन-कॉमेडी चित्रपट वाइबच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 18 सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी कुणाल खेमूने लिहिली असून त्यानेच दिग्दर्शनही केले आहे. याचबरोबर तो चित्रपटात भूमिका देखील साकारत आहे. प्रीति ही याचबरोबर ‘लाहौर 1947’ चित्रपटातही काम करत आहे. प्रीति ही मागील काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीतून दूर राहिली आहे. परंतु आता ती पुनरागमनासाठी तयार आहे.