प्रिती झिंटा म्हणाली मी 'अभिमानी हिमाचली'
अभिनेत्रीने जाणले निसर्गाला परत देण्याचे महत्त्व
मुंबई
बॉलीवूडची अभिनेत्री प्रिती झिंटा लवकरचं राजकुमार संतोषींच्या 'लाहोर १९४७' मधून सनी देओल सोबत बॉलीवूडमध्ये पुरनागमन करत आहे. अशातच तिने तिच्या जन्मभूमीला म्हणजेच शिमला येथे भेट दिली. यावेळी तिने तीन वर्षांपूर्वी देवदाराचे झाड लावले होते, जे आता मोठे झाल्याचे फोटो शेअर केले. निसर्गाला परत देण्याचे महत्त्व किती आहे अशा आशयाची इन्स्टा पोस्ट तिने केली.
इन्स्टाच्या या पोस्ट मध्ये प्रितीने झाडाचे आधीचे फोटो आणि नंतरचा फोटो शेअऱ केला आहे. तिने या झाडांची काळजी कशी घेतली आणि आता हे झाड शंकुच्या आकाराचे झाले असल्याचे या फोटोंमधून शेअर केले आहे. हे झाड कसे ३० ते ४० मीटर पर्यंत वाढले असून पूर्ण बर्फाच्छादित झालेले ही या फोटोंमधून दिसते.
कॅप्शनमध्ये लिहीते, “मी हे हिमालयन देवदाराचे झाड जवळपास ३ वर्षांपूर्वी लावले होते. हिमाचल प्रदेश थंड आणि पांढऱ्या हिवाळ्यासाठी कुच करत असताना आजूबाजूच्या सर्व बर्फासह ते वाढलेले आणि भरभराट झालेले पाहून अत्यंत आनंद झाला. असे क्षण आयुष्याला खरा अर्थ देतात आणि निसर्गाला परत देण्याचे महत्त्व सांगतात.