प्रीती लोबाना गुगलच्या उपाध्यक्ष म्हणून रुजू
दिग्गज टेक कंपनीचा निर्णय : संजय गुप्तांना बढती
नवी दिल्ली :
टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी गुगल यांनी प्रीती लोबाना यांना कंट्री मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. यासोबतच प्रीती लोबाना या कंपनीच्या भारताच्या उपाध्यक्ष म्हणून देखील सेवा बजावणार आहेत.
याआधी या पदावरती संजय गुप्ता हे कार्यरत होते. संजय गुप्ता यांना कंपनीमध्ये बढती मिळाली असून ते आता गुगलच्या आशियाई पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष म्हणून भूमिका बजावणार आहेत.
काय असेल जबाबदारी
गुगलच्या धोरणात्मक विकासासंदर्भामध्ये आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी नव्याने नियुक्त झालेल्या प्रीती लोबाना यांना आगामी काळामध्ये महत्त्वाचे योगदान द्यावे लागणार आहे. जवळपास 8 वर्षांचा अनुभव प्रीती यांना या कंपनीमध्ये असून भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देण्यासाठी त्या आगामी काळामध्ये आपली महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.