महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीच्या गादीसाठी चढाओढ...राजकारणात मोठा गोंधळ...जातीय राजकारणाला ऊत येणार; बाळूमामा भंडारा उत्सवात भाकणूक

05:29 PM Apr 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sant Balumama temple
Advertisement

सरवडे प्रतिनिधी

देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेतेमंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील. राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील, पक्षनिष्ठा घाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल. राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील. राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील. भ्रष्टाचार उदंड होईल. नेतेमंडळी तुंरुगात जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. गुंडाची राज्य येतील. जातीय राजकारणाला ऊत येईल. अशी भाकणूक कृष्णात डोणे वाघापूरकर यांनी केली.

Advertisement

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात आज पहाटे ही भाकणूक झाली.यावेळी विविध राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

संत बाळूमामा मंदिर समोर भविष्य कथन करताना कृष्णात डोणे यांनी केलेली भाकणूक पुढील प्रमाणे

भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया, चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील. भारतावर आक्रमण करतील. भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील. अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. चीन देश भारतावर आक्रमण करेल.  भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परतून लावतील अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील. युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागेल. दुनिया पेटेल. काळरात्र येईल सावध रहा.

जगात डोंगरा एवढं पाप वाढले आहे. दोऱ्याएवढच पुण्य शिल्लक आहे. कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडलय. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतय. चंद्र सुर्याची टक्कर लागेल. तीन दिवसरात्र जगात अंधार होईल. साताऱ्याच्या गादीवर फूले पडतील. सत्यानं वागा. गर्वाने वागाल तर फसाल. वारा वावटळ उदंड होतील. काळ्या खडकाच्या लाह्या होतील. विजेने मोठे नुकसान होईल. बाळुमामा यांच्या बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. दुनियेत नवल होईल. तरूण पिढी वाममार्गाला लागेल. रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील. नितीमत्ता बाळगा. पाच बोटाने धर्म करा. धर्माची बाजू पुढे न्ह्या.

तीन महिन्याचे धान्य पिकेल. खरीप बहुत होईल. तांबडे रास मध्यंतरी पांढर धान्य उदंड पिकेल. गवताची पेंडी मध्यम राहील. धान्य दारात वैरण घरात ठेवाल. धान्य महागेल. जगणं मुश्कील होईल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. तांबे लोखंड मोलाचे होईल. शेतीचा भाव वाढत जाईल. पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल. माणूस कागदाचा घोडा नाचवेल. दागीणे पैसे फुकाचे होतील. वैरणीचा भाव वाढत जाईल. वैरण धान्याच्या चोरी होतील, सांभाळून ठेवा. तांबडी रास मध्यम पीकेल. पांढर धान्य मोलाने विकेल. बैलांची किंमत बकऱ्याला, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बकऱ्यांची किंमत लाखावर जाईल.

मनुष्य जंगलात जाईल, जंगलातील पशूधन गावात येईल. वाड्यावस्त्या ओस पडतील. मेघाची वाट पहाल. पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल. पाण्याचा कप विकत मिळेल. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडेल. भुभाग जलमय होईल. नदीला कुलपे पडतील. पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील. सागरी संपत्तीचा नाश होईल. ऊन्ह्याळाचा पावसाळा होईल. धर्माचा पाऊस कर्माचा होईल. पाण्याचा कप विकत मिळेल.  मनुष्याला अठरा तऱ्हेचा आजार होईल. डॉक्टर हात टेकतील. ऊसाचा काऊस होईल. साखरेचा दर कमीजास्त राहील. . ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजेल. शेतकरी चिंतेत राहील. मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल. . विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य पर ग्रहावर राहायला जाईल. बाळुमामा शेषनागाचा अवतार हाय. या गावात मी निशाण रोवलंय, माझ ठाण मांडलय. बाळूमामांचा त्रिभुवनात जयजयकार होणार. आदमापुर बाळुमामांची पवित्र भुमी हाय. या गावाचा महिमा जगात वाढेल. आदमापूरचे श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर होईल. एकीन वागा. राजकारण आणशीला, करशीला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अगाध राहील. भगवा झेंडा राज्य करेल, मिरवेल. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचे आहे. धर्माची गादी आहे. तिला रामराम करा.

Advertisement
Tags :
Krishnat DonePredictionsSant Balumama temple
Next Article