कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हिंस्त्र प्राण्याचा मेंढपाळावर हल्ला

02:45 PM Feb 20, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली : 

Advertisement

जत तालुक्यातील कोळगिरीजवळील डोंगरात मेंढया चारण्यास गेलेल्या मेंढपाळावर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात शिवाजी पुजारी हे मेंढपाळ जखमी झाले. कुऱ्हाड उगारल्याने बिबटया सदृश्य प्राणी तेथून पळून गेल्याने मेंढपाळ बचावला. हा हल्ला बिबटयाने केल्याचे मेंढपाळाचे तर तरसाचा असावा असे वनविभागाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Advertisement

कोळगिरीजवळील डोंगरामध्ये शिवाजी पुजारीसह अन्य मेंढपाळ नियमितपणे जनावरे फिरवत असतात. दोन दिवसापूर्वी पुजारी उन्हाचा कडाका असल्याने तेथील ओगळीत असलेल्या काटेरी झुडपाच्या सावलीला बसले असताना अचानक बिबटया सदृश्य हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. त्या प्राण्याने नाकावर पंजा मारला, ओठ आणि हातालाही ओरबडले. यावेळी पुजारी यांनी हातातील कुऱ्हाड त्या प्राण्यावर उगारल्याने तो तेथून पळून गेला. त्यानंतर पुजारी यांनी आरडाओरड केल्याने त्याच डोंगर परिसरात असलेले गुराखी तेथे आले. हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पुजारी यांना जत येथे नेले. याची माहिती वनविभागाचे वनसंरक्षक संजय फड व वनपाल विष्णू ओमासे यांना समजली. त्यांनी जागेवर जावून पंचनामा केला.

ज्या ठिकाणी प्राण्याने पुजारी यांच्यावर हल्ला केला त्या ठिकाणची पहाणी केली मात्र तेथे कसल्याही प्रकारचे ठसे आढळून आले नसल्याचे सांगितले. हा हल्ला बिबटया सदृश्य प्राण्यानेच केल्याचा दावा जखमी मेंढपाळ पुजारी यांनी केला आहे. मांजरासाखे तेंड आणि पिवळसर रंगाचा तो प्राणी होता. असे पुजारी यांचे म्हणणे आहे. वन विभागाचे अधिकारी जबाबदारी झ्टकत आहेत. जीव वाचला बघा असे म्हणत असल्याचेही पुजारी यांनी सांगितले. दरम्यान जखमी पुजारी यांनी आर्थीक मदत मिळावी तसेच अशा प्रकारचे हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ला झाल्यास तातडीने संबधित विभागाने मेंढपाळ आणि गुराख्यांना मदत करावी अशीही, मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article