For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी नगरपरिषद परिसरात संविधान उद्देशिका बसवावी

सावंतवाडी नगरपरिषद परिसरात संविधान उद्देशिका बसवावी
Advertisement

ओटवणे प्रतिनिधी : भारतीय संविधानाच्या 75 व्या गौरवशाली वर्षानिमित्त येत्या शनिवारी 15 ऑगस्ट पूर्वी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात संविधान उद्देशिका बसवावी. अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर शनिवारी १५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अरुण जाधव यांनी एका निवेदनाद्वारे सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद कार्यालयासमोर तसेच तालुक्यातील महत्वाची कार्यालये व मुख्य चौक याठिकाणी भारतीय संविधानाची कोरीव दगडी कायमस्वरूपी उद्देशिका भारतीय स्वातंत्र्यदिनी म्हणजे 15 ऑगस्ट पूर्वी बसवण्यात यावी. यामुळे संविधांनाचा जागर आणि महामानवांच्या स्मृती जतन करण्यासह नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांचा प्रचार आणि गौरव होणार आहे.
याबाबत कार्यवाही न केल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर शनिवारी १५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अरुण जाधव यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.