अॅपल फोल्डेबल फोनच्या प्रि ऑर्डरला सुरुवात
वृत्तसंस्था, मुंबई
अॅपल यांनी आपला पहिला फोल्डेबल आयफोन ड्यूओ नुकताच लाँच केला आहे. भारतामध्ये या फोल्डेबल फोनकरिता प्रि ऑर्डरला सुरुवात झाली आहे. या आयफोनच्या प्रि ऑर्डरला सुरुवात होताच काही मिनिटातच मागणी वाढलेली दिसून आली. या मागणीमुळे अॅपलला सदरच्या फोनची डिलिव्हरी करण्याचे प्रयोजन करावे लागणार आहे. काही ग्राहकांना या फोनसाठी आता जानेवारी 2027 पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
कंपनीला प्री ऑर्डरमध्ये किती स्मार्ट फोनकरिता बुकिंग प्राप्त झाले आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. आधी ग्राहकांना नोव्हेंबरमध्ये फोन मिळेल, असे सांगितले गेले होते. यानंतर डिसेंबरमध्ये फोन मिळेल अशी ग्वाही कंपनीकडून देण्यात आली. पण आता याला उशिर होत असून जानेवारी 2027 पर्यंत ग्राहकांना आयफोन ड्यूओची डिलिव्हरी मिळणार आहे, असे सांगितले जात आहे.
किती असेल स्टोरेज
दोन रंगांमध्ये हा फोन सादर करण्यात येणार असून 256 जीबी ते 2 टीबी पर्यंत स्टोअरेज यामध्ये असणार आहे. अॅपलने म्हटले आहे की, ग्राहकांना लवकरात लवकर फोनचा पुरवठा करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.
विक्री कधी, किमत किती
कंपनीने ऑनलाईन ऑर्डर घेणे सुरुच ठेवले असून या फोनची विक्री 23 ऑक्टोबरपासून सुरु होऊ शकते. 256 जीबी स्मार्ट फोनची किंमती 2 लाख 99 हजार 990 रुपये, 512 जीबीच्या फोनची किंमती 3 लाख 25 हजार रुपये, 1 टीबी स्मार्ट फोनची किंमत 3 लाख 75 लाख रुपये तर 2 टीबीच्या स्मार्ट फोनची किंमती 4 लाख 50 हजार रुपये इतकी आहे.
