चीनमध्ये प्री-मेड चिल्ड्रन व्हायरल
शाळा सुरू होण्यापूर्वीच शिकविला पूर्ण अभ्यासक्रम
उन्हाळ्याच्या सुटी सर्वसाधारणपणे मुलांसाठी खेळणे, फिरणे अन् मित्रांसोबत वेळ घालविण्याची संधी असते. परंतु चीनमध्ये काही मुलांसाठी सुट्यांचा अर्थ आता पूर्वीपासून पुढील वर्गाची तयारी करणे ठरला आहे. तेथे आईवडिल मुलांना शाळेचे नवे सत्र सुरू होण्यापूर्वीच अनेक विषयांचे शिक्षण करविण्यास मग्न आहेत. याच ट्रेंडवरून चीनमध्ये ‘प्री-मेड चिल्ड्रन“ म्हणजेच ‘पूर्वीपासून तयार मुले“ शब्द चर्चेत आहे. हा शब्द यासाठी वापरला जातोय कारण काही आईवडिल मुलांना सुट्यांमध्येच पुढील धडे शिकवू इच्छित आहेत. यामुळे मुले शाळेत शिकविण्यात येणाऱ्या धड्याला प्रथम समजून घेतील आणि इतर मुलांच्या तुलनेत आघाडीवर राहतील असे त्यांचे मानणे आहे.
चीनच्या झेजियांग प्रांतातील एक आई स्वत:च्या मुलाला सुट्यांमध्ये पुढील वर्गासाठी तयार करत आहे. तिचा मुलगा इयत्ता चौथीत शिकत आहे. सुट्यांदरम्यान त्याला चिनी कविता पाठ करणे, इंग्रजीचे शब्द शिकणे आणि गणिताच्या ऑनलाइन वर्गात सामील होण्यास सांगण्यात आले आहे. यातील अनेक गोष्टी मुलाला पुढील शैक्षणिक सत्रात शाळेत शिकविण्यात येणार आहेत. म्हणजेच शाळा सुरु होण्यापूर्वीच मुलगा ते धडे अभ्यासत आहेत. त्याचे आईवडिल कामावरून परतल्यावरही मुलाच्या शिक्षणासाठी वेळ देत आहेत. यामुळे आईवडिल अन् मुले तिघांचाही सुट्यांमधील वेळ अत्यंत व्यग्र होतो. तरीही आपल्या मुलाला पूर्वीच शिकविले नाही तर तो इतर मुलांपासून मागे राहू शकतो अशी भीती आईवडिलांना असते.
आईवडिलांना का वाटते आवश्यक?
यामागील सर्वात मोठे कारण मुलांदरम्यान वाढती शैक्षणिक प्रतिस्पर्धा असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या मुलाने परीक्षेत चांगले गुण मिळवावेत आणि तो अभ्यासात तो इतरांपेक्षा पुढे रहावा असे अनेक आईवडिलांना वाटत असते. याच विचारासह काही आईवडिल शाळा सुरू होण्यापूर्वीच मुलांना अभ्यासक्रमाचा एक हिस्सा शिकवितात. यामुळे शाळेत शिक्षक जेव्हा तोच विषय शिकवतील तेव्हा मुलाला गोष्टी सहजपणे समजतील असे त्यांना वाटते. परंतु याचबरोबर दुसरी चिंताही समोर येत आहे. जर प्रत्येक परिवार स्वत:च्या मुलाला पूर्वीच शिकवू लागला तर प्रतिस्पर्धा आणखी वाढू शकते.
प्री-मेड चिल्ड्रन नाव का?
प्री-मेड शब्दाचा वापर सर्वसाधारणपणे पूर्वीपासून तयार गोष्टींसाठी केला जातो. चीनमध्ये सोशल मीडियावर या शबदला मुलांच्या शिक्षणाशी जोडून वापरले जात आहे. हे नाव अशा मुलांसाठी एकप्रकारचे व्यंग आहे, ज्यांना सुट्यांमध्ये देखील सातत्याने शिकवून पुढील सत्रासाठी पूर्वीच तयार केले जात आहे. मुलांना प्रत्येकवेळी कामगिरी अन् शिक्षणाच्या शर्यतीत ठेवण्याच प्रयत्न त्यांच्या बालपणाच्या सामान्य अनुभवांना कमी करतोय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
सुट्या अन् शिक्षणादरम्यान संतुलन
सुट्यांमध्ये काही प्रमाणात अभ्यास करणे चुकीचे नाही. मुलांना मागील शिक्षणाची आठवण अन् स्वत:च्या पसंतीची नवी गोष्ट शिकण्याची संधी दिली जाऊ शकते. परंतु सुट्यांमध्ये बहुतांश वेळ केवळ शिक्षण, वर्ग अन् गृहअभ्यासात जात असेल तर मुलांसाठी आराम अन् मनोरंजनाचा वेळ कमी होऊ शकतो. बालपणी खेळणे, परिवारासोबत वेळ घालविणे आणि स्वत:च्या पसंतीच्या क्रियांमध्ये भाग घेणेही महत्त्वपूर्ण असते. याचमुळे मुलांच्या शिक्षणासोबत त्यांना आराम अन् पसंतीच्या गोष्टींमध्ये वेळ देणे आवश्यक असते.

सोशल मीडियावर होतेय चर्चा
प्री-मेड चिल्ड्रन शब्दाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. स्पर्धात्मक शैक्षणिक व्यवस्थेत आईवडिलांकडे स्वत:च्या मुलांना पूर्वीच तयार ठेवण्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक राहत नाही असे काही लोकांचे मानणे आहे. अखेर मुलांना सदैव पुढे जाण्याच्या शर्यतीत का ठेवले जावे असा काही लोकांचा सवाल आहे. चीनमध्ये प्री-मेड चिल्ड्रनचा ट्रेंड केवळ सुट्यांमध्ये शिक्षण करविण्याची कहाणी नाही. हा मुलांचे शिक्षण, आईवडिलांची चिंता आणि वाढत्या स्पर्धेदरम्यान संतुलनाचा सवालही उपस्थित करतो. मुलांना दर सुटीत पुढील वर्गासाठी तयार करणे आवश्यक आहे का, त्यांना काही वेळ अभ्यासाशिवाय स्वत:च्या पद्धतीने जगू दिले जावे का असा प्रश्न उपस्थित होतो.