For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेस्कॉम अधीक्षक अभियंतापदी प्रवीणकुमार चिकार्डे यांची नियुक्ती

10:10 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेस्कॉम अधीक्षक अभियंतापदी प्रवीणकुमार चिकार्डे यांची नियुक्ती
Advertisement

बेळगाव : हेस्कॉममध्ये बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्याच्या अधीक्षक अभियंतापदी प्रवीणकुमार चिकार्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी विनोद करुर यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे मागील अनेक दिवसांपासून रिक्त असणाऱ्या जागांवर कायमस्वरुपी अधिकारी उपलब्ध झाले आहेत. अनेक वर्षांपासून प्रवीणकुमार चिकार्डे हे बेळगाव व खानापूर तालुक्याचे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. दोन्ही तालुक्यांमध्ये निरंतर ज्योती योजना गावागावापर्यंत पोहोचविण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. खानापुरातील दुर्गम गावांपर्यंत वीजपुरवठा पोहोचविण्यात आला. त्यांची बेळगाव विभागाच्या अधीक्षक अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. विनोद करुर यांनी बेळगाव शहरासह तालुक्यात साहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून सेवा बजावली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांची ग्रामीण उपविभाग-1 मध्ये बदली झाली होती. त्यांच्याकडे बेळगाव व खानापूर तालुक्यांचा कार्यकारी अभियंत्याचा पदभार दिला आहे. ग्रामीण उपविभाग-1 चे साहाय्यक कार्यकारी अभियंता तसेच बेळगाव व खानापूर तालुक्याचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पहावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी रिक्त जागा भरण्यासाठी हेस्कॉमने बदल्यांचे सत्र सुरू केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.