For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रतीका रावल कसोटीतून बाहेर

06:33 AM Jul 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रतीका रावल कसोटीतून बाहेर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

या आठवड्यात लॉर्ड्सवर भारत-इंग्लंड महिलांची एकमेव कसोटी होणार असून या ऐतिहासिक सामन्यासाठी प्रतीका रावल उपलब्ध होणार नसल्याची पुष्टी भारताचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी केली आहे, तिच्या जागी प्रिया पुनियाची निवड करण्यात आली आहे.

या आठवड्यात प्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यातून प्रतीका रावल बाहेर पडली आहे. प्रतीकाने अलीकडेच इंग्लंड अ विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते, ज्यात भारत अ संघाने 2-1 ने मालिका जिंकली होती. या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ती खेळली नव्हती. मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे प्रतीका रावल कसोटी सामन्यातून बाहेर पडली आहे. तिच्या गुडघ्यावर जखम झाली होती आणि त्यासाठी काही टाके घालावे लागले. ती कसोटी सामन्यासाठी उपलब्ध नाही आणि तिच्या जागी प्रिया पुनियाचा संघात समावेश करण्यात आला आहे, असे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अ संघाचा भाग असलेली प्रिया पुनिया आता या चार दिवसांच्या कसोटी सामन्यासाठीच्या संघात तिची जागा घेणार आहे. प्रतीकाने पर्थमध्ये ऑस्टेलियाविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातून पदार्पण केले होते. त्यात तिने 43 चेंडूत 18 धावा आणि 63 चेंडूत 137 धावा केल्या होत्या. परंतु घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने हा समाना 10 गडी राखून जिंकला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.