कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सारे जहां से अच्छा’मध्ये प्रतीक गांधी

06:22 AM Aug 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतीक गांधी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता आहे. मोठ्या पडद्यावर त्याचे चित्रपट फारसे यशस्वी ठरलेले नसले तरीही तो ओटीटी जगतात प्रख्यात आहे. आता पुन्हा एकदा ओटीटीवर स्वत:च्या नव्या वेबसीरिजसह तो परतणार आहे. प्रतीक गांधी याच्या या वेबसीरिजमध्ये अनेक दमदार कलाकार आहेत. या सीरिजचे नाव ‘सारे जहां से अच्छा’ आहे. सुमित पुरोहितच्या दिग्दर्शनात तयार या नव्या वेबसीरिजची कहाणी 1970 च्या दशकातील भारतावर आधारित आहे. भारतीय गुप्तहेर जगतातील हेरांची बुद्धी, त्यांची नैतिकता आणि रहस्यांवर याची कहाणी बेतलेली आहे. सीरिजमध्ये प्रतीकने विष्णू शंकर ही व्यक्तिरेखा साकारली असून तो भारतीय गुप्तचर संघटनेचा अधिकारी आहे.

Advertisement

प्रत्येक संघर्ष मैदानात होत नाही, काही संघर्ष हे सावल्यांमध्येही करावे लागतात असे या सीरिजचे पोस्टर शेअर करत कॅप्शनदाखल म्हटले गेले आहे. ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर 13 ऑगस्टपासून पाहता येईल. प्रतीकसोबत या सीरिजमध्ये सनी हिंदुजा, सुहैल नायर, तिलोत्तम शोम, कृतिका कामरा, रजत कपूर समवेत अनेक कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article