कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कार्तिकसोबत जमणार प्रतिभा रांटाची जोडी

06:31 AM Dec 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नॉर्वेत अनोखी शॉपिंग क्रांती होत आहे. येथे कुठल्याही स्टाफशिवाय दुकाने 24 तास उघडी असतात. क्रेडिट कार्ड स्वाइप किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर दुकानाचा दरवाजा उघडतो. आत जाऊन सामग्री निवडायची, सेल्फ-चेकआउटवर स्पॅन करणे, अॅप किंवा कार्डद्वारे पेमेंट करत शॉपिंग करता येते. मग दरवाजा ऑटोमॅटिक उघडतो, दुकानांमध्ये एआय, कॅमेरा आणि आरएफआयटीद्वारे चोरी रोखली जाते. ही सिस्टीम ग्रामीण भाग आणि रात्रीदेखील सुविधा देते.

Advertisement

Advertisement

कुठल्याही स्टाफशिवाय ऑपरेट होणाऱ्या या दुकानांमध्ये तुम्ही स्वत: आत जात शॉपिंग करू शकता. स्वत:च्या क्रेडिट कार्डद्वारे स्टोरचा दरवाजा उघडावा लागतो. यानंतर स्टोरच्या आत जात सामग्री खरेदी करता येते. सामग्रीला स्कॅन करून बिल पे केले जाते. यानंतर स्टोरचा दरवाजा उघडतो आणि तेथून बाहेर पडता येते.  ही काही काल्पनिक जगाची कहाणी नसून नॉर्वेतील वस्तुस्थिती आहे. तेथे अनमॅन्ड स्टोअर्स आता सामान्य बाब ठरली आहे.

ही अवधारणा 2019 मध्ये सुरू झाली तेव्हा कूप नॉर्वेने ओस्लोच्या मध्यवर्ती भागात स्वत:चे पहिले अनमॅन्ड स्टोर उघडले. कूप एक्स्ट्रा ब्रँड अंतर्गत हे दुकान दिवसा सामान्य स्वरुपात चालते. परंतु रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णपणे ऑटोमॅटिक मोडमध्ये जाते. ग्राहक क्यूआर कोड स्कॅन करून किंवा क्रेडिट/डेबिट कार्ड स्वाइप करूनच आत शिरतात, नॉवेंत कार्ड पेमेंटच मुख्य पद्धत आहे. पॅशचा वापर अत्यंत कमी होतो.

असे करावे शॉपिंग

एकदा स्टोरमध्ये शिरल्यावर ग्राहक स्वत:साठी सामग्री निवडतो. मग सेल्फ-चेकआउट मशीनवर बारकोड स्पॅन करतो. पेमेंट अॅप किंवा कार्डद्वारे होते. जर काही स्कॅन केले नसल्यास अलर्ट वाजतो. बाहेर निघताना मग क्यूआर कोड किंवा कार्ड वेरिफाय करावे लागते. ही सिस्टीम चोरी रोखण्यासाठी अत्याधुनिक आहे. कॅमेरे, एआय अल्गोरिदम आणि आरएफआयटी टॅग्स हालचालीला ट्रॅक करतात. नॉर्डिक आयडी सारख्या कंपन्या आरएफआयडी रीडर्सचा वापर करतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article