डियर कॉम्रेडच्या रिमेकमध्ये प्रतिभा रांटा
सिद्धार्थ चतुर्वेदी देखील झळकणार
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा गाजलेला चित्रपट ‘डियर कॉम्रेड’ची कहाणी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. परंतु यावेळी यातील कलाकार वेगळे असणार आहेत. 2019 मधील या हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार केला जात आहे.

डियर कॉम्रेड या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे हक्क करण जौहरच्या धर्मा प्रॉडक्शनने विकत घेतले होते. आता निर्मितीसंस्था या प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात करणार आहे. धर्मा प्रॉडक्शनने या रिमेकसाठी सिद्धांत चतुर्वेदी आणि प्रतिभा रांटा यांची नावे निश्चित केली असल्याचे समजते. ‘धडक 2’ मधील सिद्धांत चतुर्वेदीच्या भूमिकेला मोठी पसंती मिळाली होती. यामुळे ‘डियर कॉमरेड’च्या रिमेकच्या कहाणीत आवश्यक इंटेसिटी आणण्यासाठी तो पहिली पसंती ठरला आहे. तर प्रतिभा रांटा ही इमोशनल आर्कसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
निर्माते हिंदी रिमेकमध्ये कहाणीत फारसे बदल करणार नाहीत. परंतु याला पॅन इंडियन प्रेक्षकांच्या हिशेबाने निर्माण करण्यात येणार आहे. ‘डियर कॉमरेड’ चित्रपट नव्या प्रेक्षकांसाठी पुन्हा निर्माण करण्याची कल्पना आहे. यापूर्वी हिंदी रिमेकमध्येही विजय आणि रश्मिका हेच दिसून येतील असे बोलले जात होते. परंतु आता प्रतिभा आणि सिद्धांत यांची नावे समोर आली.