‘मुंज्या 2’मध्ये प्रतिभा रांटा
अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांचा ‘मुंज्या’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता याचा सीक्वेल येणार आहे. निर्मात्यांनी यावर कामही सुरू केले आहे. परंतु यावेळी ‘मुंज्या 2’ चित्रपटात शर्वरी सोबत आणखी एक अभिनेत्री दिसून येणार आहे. या दुसऱ्या अभिनेत्रीच्या स्वरुपात प्रतिभा रांटा मुख्य भूमिकेत असू शकते. प्रतिभा रांटा यापूर्वी ‘लापत्ता लेडीज’मध्ये दिसून आली होती. प्रतिभाला आता ‘मुंज्या 2’ चित्रपटासाठी निवडण्यात आले आहे. चित्रपटाच्या कथेत आणखी एक भूमिका जोडण्यात आली आहे. शर्वरी आणि अभय हे दोघेही ‘मुंज्या 2’ चित्रपटात असणार आहेत. परंतु यावेळी त्यांना प्रतिभाची जोड मिळणार आहे. ‘मुंज्या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. यात मोना सिंह, भाग्यश्री लिमये, सुहास जोशी आणि अन्य कलाकार दिसून आले होते. चित्रपटाने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. आता चाहते या हॉरर कॉमेडी चित्रपटाची पुढील कहाणी पाहण्यासाठी उत्सुक आहेत.