व्हॅलेटाईन डे ला प्रतिक-प्रिया यांनी घेतले सात फेरे
मुंबई
व्हॅलेटाईन डे या प्रेमाच्या मुहुर्तावर अभिनेता प्रतिक बब्बर आणि प्रिया बॅनर्जी यांनी सात फेरे घेतले. या लग्नावेळी अभिनेता प्रतिक बब्बर भाऊक झाल्याचे दिसून आले. प्रतिक बब्बरचे प्रिया बॅनर्जी सोबत हे दुसरे लग्न असून सान्या सागर हिच्या सोबत २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली.
प्रतिक बब्बर याने आई स्मिता पाटील यांच्या बांद्रे येथील घरात लग्नगाठ बांधली. एका खासगी सोहळ्यामध्ये या विवाह समारंभ पार पडला. या सोहळ्याचा व्हीडीओ इन्स्टाग्रामवरून त्यांनी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. या व्हिडीओसोबत प्रतिकने एक भावूक पोस्टही शेअर केली आहे.
याम्ध्ये प्रतिक लिहीतो, "आम्हाला घरातचं लग्न करायचं होतं आणि लव्ह ऑफ लाईफ ते लग्नापर्यंत घरापेक्षा दुसरे ठिकाण कोणतेही असू शकत नाही. हे पहिले घर आहे जे माझ्या आईने खरेदी केलं होतं. प्रिया बॅनर्जी ही एक अभिनेत्री आहे. ती बंगाली असून तिचे संगोपन कॅनडामध्ये झालेले आहे. तिने आजवर हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रियाचा २०१३ मध्ये किस हा तेलुगु भाषेतील पहिला चित्रपट आहे.