For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रताप कालकुंद्रीकर श्री गणेश किताबाचा मानकरी

10:32 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रताप कालकुंद्रीकर श्री गणेश किताबाचा मानकरी
Advertisement

मोरेश देसाईला उत्कृष्ट पोझरचा बहुमान

Advertisement

बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक, मार्केट व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 20 व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत पॉलिहैड्रॉनचा प्रताप कालकुंद्रीकर आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर श्री गणेश किताबाचा मानकरी ठरला. तर बी स्ट्राँग जिमच्या मोरेश देसाईने उत्कृष्ट पोझरचा मान मिळविला. रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्केट झेंडा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे गेली 19 वर्षे होत असलेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष गोगटे, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, डॉ. रवी पाटील, आशियाई पंच अजित सिद्दण्णावर, सचिन हंगिरगेकर, विशाल मुरकुंबी, मोतीचंद दोरकाडी, राहुल चौगुले, विनायक पाटील, कृष्णमूर्ती एस., विजय तलवार, अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, श्रीराम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गणेशमूर्तींचे पूजन शिरीष गोगटे यांच्या हस्ते, हनुमान मूर्तींचे पूजन डॉ. रवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल पुढीलप्रमाणे

Advertisement

  • 55 किलो वजनी गटात - 1) आदर्श कल्लोळकर (बी स्ट्राँग), 2) मंजुनाथ कलादगी (फ्लॅक्स), 3) तुकाराम गौडा (ओम फिटनेस), 4) केतन भातकांडे (युनिव्हर्सल), 5) रोनक गवस (चॅम्पियन).
  • 60 किलो वजनी गटात - 1) फैरोज वडगावकर (मॉडर्न), 2) निलेश गोरल (पॉलिहैड्रॉन), 3) गजानन गावडे (बी स्ट्राँग), 4) आदित्य सैनुचे (मोरया), 5) आकाश गौडा (मोरया).
  • 65 किलो वजनी गटात - 1) विशाल भोसले (एक्स्ट्रीम), 2) संतोष हुंदरे (गोल्ड जिम), 3) विजय निलजी  (फिट फ्लॅक्स), 4) शुभम नारळकर (एस. जी. बाळेकुंद्री), 5) रितेश हणमंताचे (नेक्स्ट लेव्हल).
  • 70 किलो वजनी गटात - 1) आदित्य यमकनमर्डी (गोल्ड), 2) सुनील भातकांडे  (पॉलिहैड्रॉन), 3) पवन सावंत (ब्ल्यू रॉक), 4) मंजुनाथ कोल्हापुरे (लाईफटाईम), 5) रमेश बोमन्नावर  (आप्पाजी).
  • 75 किलो वजनी गटात - 1) प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहैड्रॉन), 2) मंजुनाथ सोनटक्की  (नेक्स्ट), 3) प्रशांत गावडा (शिवसमर्थ), 4) मोरेश देसाई (बी स्ट्राँग), 5) संदीप पावले (मॉडर्न).
  • 80 किलो वजनी गटात - 1) गणेश पाटील (पॉलिहैड्रॉन), 2) मनीष सुतार  (बेळगावकर फिट), 3) विनायक अनगोळकर (बॉडी बेसीक), 4) रोहीत मकने (मंथन).
  • 80 किलोवरील गटात -  1) राहुल कलाल (नेक्स्ट), 2) पृथ्वीराज कोलकार (जयाराज), 3) सुजित शिंदे (रुद्र), 4) शिवानंद कातगौडर (त्रिलोकना), 5)  युवराज पाटील (वज्र) यांनी आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.

त्यानंतर श्री गणेश किताबासाठी आदर्श कल्लोळकर, फैरोज वडगावकर, विशाल भोसले, आदित्य यमकनमर्डी, प्रताप कालकुंद्रीकर, गणेश पाटील, राहुल कलाल यांच्यात लढत झाली. प्रताप कालकुंद्रीकर व फैरोज वडगावकर यांच्यात तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर पॉलिहैड्रॉनच्या प्रताप कालकुंद्रीकर याने श्री गणेश हा मानाचा किताब पटकाविला. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे डॉ. रवी पाटील, कृष्णमूर्ती, अजित सिद्दण्णावर, विनोद तलवार, अमित किल्लेकर, राजू होनगेकर, सचिन हंगिरगेकर, विशाल मुरकुंबी, श्रीराम कुलकर्णी, एम. गंगाधर, हेमंत हावळ आदी मान्यवरांच्या हस्ते प्रताप कालकुंद्रीकरला आकर्षक चषक, रोख रक्कम, फिरता चषक, प्रमाणपत्र, चषक देवून गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील उत्कृष्ट पोझर बी स्ट्राँगचा मोरेश देसाईला चषक, भेटवस्तु व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना मंडळातर्फे टी-शर्ट, भेटवस्तू, मिठाई वाटप करण्यात आली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, एम. गंगाधर, एम. के. गुरव, हेमंत हावळ, सुनील पवार, अनंत लंगरकांडे, सुनील अष्टेकर, नूर मुल्ला, हंगिरगेकर, बसवराज अरळीमट्टी, आकाश हुलीयार, तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.