For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रताप बेळगाव श्री-हर्क्युलसचा किताबाचा मानकरी

12:10 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रताप बेळगाव श्री हर्क्युलसचा किताबाचा मानकरी
Advertisement

गुरुनाथ घारगे पहिले उपविजेते, विशाल गावडे दुसरे उपविजेते, उत्कृष्ट पोझर मोरेश देसाई, प्रतापने 45 व्या वर्षातही लाजविले तरुणाईला

Advertisement

बेळगाव : मराठा युवक संघ, बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 58 व्या बेळगाव श्री जिल्हास्तरीय स्पर्धेत पॉलिहैड्रॉनच्या प्रताप कालकुंद्रीकरने बेळगाव श्री हा मानाचा किताब विटकावीला. तर बी स्ट्रॉंग जिमच्या मोरेश देसाईने उत्कृष्ट पोझर किताब फटकाविला. बेळगाव हर्क्युलस शरीरसौष्ठव स्पर्धेत कर्नाटकाच्या प्रताप कालकुंद्रीकरने हा मानाचा किताब फटकाविला. महाराष्ट्राच्या गुरुनाथ घारगेने पहिले उपाविजेपद, विशाल गावडेने दुसरे उपविजेपद पटकाविले. मराठा मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेल्या या स्पर्धेत आयबीबीएफच्या नियमानुसार ही स्पर्धा बेळगाव श्री स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

  • 55 किलो गट- 1) अवनीश पारे (सिद्धांत फिटनेस), 2) नितेश मजुकर (मेणशे फिटनेस), 3) आकाश लिंग राणी (चॅम्पियन,) 4) धनेश्वर वाणी (बी स्ट्रॉंग), 5)ऋतीक पाचापुर (मेंणसे फिटनेस),
  • 60 किलो गट:- 1) गजानन गावडे (बी स्ट्रॉंग), 2) नितीश गोरल (कार्पोरेशन), 3)सुहास दिवटे (फिटनेस पॉवर), 4) राजू गडकरी (बिग मस्क्युलर), 5) ओमकार पाटील (बिग मस्कुलर).
  • 65 किलो गट: 1) ओमकार पाटील (युनिव्हर्सल),2) संतोष उंदरे (मस्कुलर फिट), 3) किशन संताजी (श्री समर्थ), 4) आदित्य मोरे (बॉडी बेसिक), 5) रितेश हणम्मंताचे (बॉडी वर्क),
  • 70 किलो गट : 1)सुनिल भातकांडे (रॉयल फिट), 2)गणेश पाटील (मोरया), 3)भरत तलवार (अष्टेकर),4)बसु कोणेरी 5)मयूर मेंणसे (मेणसे फीट़),
  •   75 किलो गट : 1)प्रताप कालकुंद्रीकर (पॉलीहाँड्रोन), 2)संदीप पावले (मॉडर्न), 3)रोहन केसरकर (एस एस फाउंडेशन), 4)राहुल हिरोजी (युनिव्हर्सल), 5)राघवेंद्र नाईक (मोरया),
  • 80 किलो गट : 1)महेश गवळी (एस एस फाउंडेशन), 2)राहुल कलाल, 3) रवी गाडीव•र (बॉडी पावर), 4)मोरेश देसाई (बी स्ट्रॉंग), 5) पृथ्वीराज कोलकार (बॉडी टोन),
  • 80 वरील गट : 1)सुजित शिंदे (फोर्स फिट), 2)अमर गुरव (फोस फिट), 3)व्यंकटेश किल्लेकर (मोरया), यांनी विजेतेपद पटकाविले. बेळगाव श्री हा किताब पॉलीहैड्रॉनच्या प्रताप कालकुंद्रीकर यांनी पटकाविला. तर बी स्ट्रॉंग जिमच्या मोरेश देसाईने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकावीला.

बेळगाव हर्क्युलस तीन राज्यांच्या निमंत्रितांच्या स्पर्धेत 60 किलो गटात: 1)अवधूत निगडे (महाराष्ट्र), 2)गंगाधर स्वामी (कर्नाटक), 3)अहमदखान पठाण (गोवा), 4)राहुल प्रसाद (गोवा), 5)गजानन गावडे (कर्नाटक). 70 किलो गट: 1)प्रताप कालकुंद्रीकर (कर्नाटक), 2)राजू तेली (गोवा), 3)गणेश पाटील (कर्नाटक), 4)सुनील भातकांडे (कर्नाटक), 5)झाकीर हुल्लुर (कर्नाटक), 80 किलो गट: 1)विशाल गावडे (महाराष्ट्र), 2)महेश गवळी (कर्नाटक), 3) प्रसाद बाचीकर (कर्नाटक), 4)रंजीत चौगुले (महाराष्ट्र), 5)रवी गाडीव•र (कर्नाटक), 80 किलो वरील गट: 1)गुरुनाथ घारगे (महाराष्ट्र), 2)समर्थ दालगी (महाराष्ट्र), 3)अमर गुरव (कर्नाटक), 4)काशिनाथ नायकर (कर्नाटक), यांनी विजेतेपद पटकाविले. बेळगाव हर्क्युलस किताबासाठी प्रताप कालकुंद्रीकर, गुरुनाथ गारर्गे, विसाल गावडे, अवधूत निगडे यांच्यात लढत झाली त्यामध्ये कर्नाटकाच्या प्रताप कालकुंद्रीकर यांनी आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर बेळगाव हर्क्युलस हा मानाचा किताब पटकावीला, महाराष्ट्राच्या गुरुनाथ घारगे यांनी पहिले उपविजेतेपद, तर विशाल गावडे महाराष्ट्र यांनी दुसरे उपविजेतेपद पदकाविले, स्पर्धेनंतर बाळासाहेब काकतकर, संजय मोरे, दिगंबर पवार, नेताजी जाधव, चंद्रकांत गुंडकल, रघुनाथ बांडगी, मारूती देवगेकर, दिनकर घोरपडे, शिवाजी हंगिरगेकर, रमेश पावले, सुनिल भोसले, नारायण किटवाडकर, अजित सिद्दण्णवर, जे.डी. भट आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी अजित सिद्धण्णवर, गंगाधर एम, बसवराज आरळीमट्टी, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, सुनील पवार, सुनील राऊत, जी.डी भट्ट, उमा महेश, जे. नीलकंठ, नूर मुल्ला, गजानन हंगीरगेकर, सुनील अष्टेकर, आकाश हुलियर यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.