अल्पवयीन मुलाचा प्रताप, हवेत केला गोळीबार
मोलकरणीच्या मुलाने रिव्हॉलवर चोरून केले
३५ राऊंड फायर उजळाईवाडी येथील धक्कादायक प्रकार
कोल्हापूर
गोकुळ शिरगांव पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये निवृत्त पोलिस उप अधिक्षक महावीर सकळे यांच्या घरातून जर्मन बनावटीचे लायसन्स धारी पिस्तुल चोरीला गेले. हे पिस्तुल ३१ जानेवारीच्या दुपारी तर १ तारखेच्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान चोरीला गेल्याची माहिती मिळाली, महावीर सकळे यांनी दिली. या पिस्तुलाचे ३७ जिवंत राऊंडही चोरीला गेल्याचेही तक्रारदार यांनी सांगितले. ही माहिती मिळताच जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी तत्काळ गोकुळ शिरगांव पोलिस स्टेशन पोलिस उप अधिक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना ही माहिती सांगून गुन्हा उघडकीस आणण्याबाबच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान सकळे यांच्याकडे काम करणारी मोलकरीण पल्लवी माने यांचा मुलगा ३१ तारखेच्या दुपारी घरात आल्याचे चौकशी दरम्यान समजले. दरम्यान गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनच्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक मगदूम मॅडम यांनी त्या मुलास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान ही पिस्तुल त्याच्याकडे सापडली. त्याच्याकडे जिवंत राऊंडविषयी चौकशी केली असता. त्याने हे जिवंत राऊंड मणेर मळा येथील मोकळ्या मळ्यावर १ फेब्रुवारीला सकाळी ८ च्या दरम्यान हवेत फायरींग केल्याचे सांगितले. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र सुजल हा ही होता. याठीकाणी २० फायर केलेल्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. इतर पुंगळ्या अद्याप मिळाल्या नाहीत, उर्वरित पुंगळ्यांचा शोध सुरु आहे. याशिवाय दोन जिवंत राऊंड मुलाच्या घरातून मिळाले आहेत. उर्वरित १२ राऊंडच्या पुंगळ्यांचा शोध सुरू आहे. मोलकरणीच्या मुलाला चौकशीसाठी ताब्य़ात घेतले असताना, फायरींग करायचे कुठे शिकला अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने आणि त्याच्या मित्राने यु ट्युबवर पाहून शिकला असल्याचे सांगितले. तपासा दरम्यान या मुलांनी सर्वच्या सर्व राऊंड फायर केल्याचे सांगितले. यापैकी २२ राऊंडचा शोध लागला आहे. उर्वरित पुंगळ्या किंवा जिवंत राऊंड याबाबत शोध सुरु आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.