For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

प्रसिद्ध कृष्णा वनडे मालिकेतून बाहेर

04:49 AM Oct 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रसिद्ध कृष्णा वनडे मालिकेतून बाहेर
Advertisement

आकिब नबीचा समावेश होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या एकदिवशीय मालिकेत खेळणार नाही. जो अजूनही आपल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या एक सूत्राने बुधवारी दिली.

Advertisement

दरम्यान लिंकन येथे भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात झालेल्या पहिल्या अनधिकृत रेड बॉल सामन्यात जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी याने प्रभावी कामगिरी केली आहे. प्रसिद्धची प्रकृती सुधारत आहे. 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बेंगळूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याची मॅच सिम्युलेशन  आणि फिटनेस चाचणी होणार आहे. बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले की, संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समिती, दोघांचेही असे मत आहे की प्रसिद्धने कसोटी सामन्यांसाठी पूर्णपणे तयार असायला हवे. कारण एकदिवशीय सामन्यांच्या तुलनेत कसोटीत त्याची अधिक गरज भासू शकते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरगुती एकदिवशीय मालिकेदरम्यान प्रसिद्धला ही दुखापत झाली होती.

Advertisement
Tags :

.