For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव

07:54 PM Feb 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव
Advertisement
चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी येथील भाजप नेते प्रशांत यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुरुवारी अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे. रत्नागिरी दक्षिण भागात भाजप संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. प्रशांत यादव यांनी यापूर्वी नगर परिषद तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष संघटन मजबूत ठेवत प्रभावी नियोजन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण व परिसरात पक्षाला उल्लेखनीय यश मिळाले होते. बूथस्तरावरील संघटन, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गुरुवारी यादव यांच्या नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
Advertisement
Advertisement
Tags :

.