For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांकीपूर पोटनिवडणूक लढविणार प्रशांत किशोर

06:01 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांकीपूर पोटनिवडणूक लढविणार प्रशांत किशोर
Advertisement

नितिन नवीन यांच्या राजीनाम्यामुळे जागा रिक्त

Advertisement

वृत्तसंस्था, पाटणा

बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जनसुराज पक्षाने स्वत:चा उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा आणि निवडणूक रणनीतिकार म्हणून प्रसिद्ध प्रशांत किशोर या मतदारसंघात निवडणूक लढविणार आहेत. रविवारी पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रशांत किशोर बांकीपूरमध्ये सातत्याने दौरा करत रालोआला पराभूत करण्याचे आवाहन करत आहेत. तर काँग्रेस नेते ऋषि मिश्रा यांनी प्रशांत किशोर यांना विरोधी पक्षांकडून समर्थन देण्यात यावे असे म्हटल्याने बांकीपूर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Advertisement

उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रशांत किशोर यांनी पाटणा येथील महावीर मंदिरात जात पूजा केली. त्यानंतर शिव मंदिरात जात त्यांनी प्रार्थना केली आहे. पुढील 5 वर्षांपर्यंत बिहारमध्ये जोपर्यंत परिवर्तन घडून येत नाही तोवर संघर्ष करत राहणार आहे. मी पूर्ण प्रामाणिकपणे काम करणार आहे. बांकीपूरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून आल्यावर मी 242 आमदारांना वरचढ ठरणार आहे. मुख्यमंत्री सम्राट चौधरी हे एक निवडले गेलेले मुख्यमंत्री आहेत. त्यांचा खरा चेहरा लवकरच सर्वांसमोर येईल असा दावा प्रशांत यांनी यावेळी केला आहे.

Advertisement
Tags :

.