साताऱ्यातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध प्रसाद ओकचा लढा
सातारा :
साताऱ्यात प्रत्येक शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार होवू नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जावून प्रचार, प्रसिद्धी केली आहे. पोस्टर कार्यालयातील भिंतीवर जावून चिटकवले आहेत. बसस्थानकात जावून प्रबोधन केले आहे.
असे असतानाच आता अभिनेता प्रसाद ओक, अभिनेता सयाजी शिंदे, अभिनेत्री गौरी इंगवले यांनी साताऱ्याच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा पुकारला आहे. त्यांनी स्वतः आवाहन केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एसीबी आपल्या दारी या उपक्रमातंर्गत त्यांनी हे आवाहन केले आहे.
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा नेहमीच सरस कारवाया करत आलेला आहे. त्यामध्ये काही कारवाया तर राज्यपातळीवर गाजल्या आहेत. सातारचे लाचलुचपतचे उपअधीक्षक राजेश वाघमारे हे आधीच धस्टपुष्ट, फिटनेस फंड्यात असल्याने ते कुठेही गेले तरीही लगेच पोलीस असल्याचेच ओळखून येतात. ते साध्या पेहरावात असले तरीही त्यांच्या राहणीमानामुळे ते अधिकारी असल्याचे लांबूनच ओळखतात. सातारा बसस्थानकासह त्यांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात स्वतः जावून लाच घेवू नका असे प्रबोधन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अभिनेते प्रसाद ओक, सयाजी शिंदे आणि गौरी इंगवले यांनी स्वतः आवाहन केले आहे नका, लाच देवू नका, की लाच घेवू लाच कोणी मागितली तर थेट सातारचे लाच लुचपतचे पोलीस उपअधिक्षक राजेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन केले आहे.
- एसीबी आपल्या दारी उपक्रम
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा कार्यालय हे सातारा शहरात आहे. दुर्गम भागात व ग्रामीण भागात नागरिकांना तक्रार देण्यसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याचे गैरसोय टाळण्यासाठी लाचलुचपत विभागाकडून दिलेल्या नंबरवर संपर्क केल्यास ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी येवून त्या तक्रारींची दखल घेवून कारवाई केली जाते. त्याकरता होणारी गैरसोय आणि प्रवासाचा वेळ तसेच खर्च टाळता येतो. त्याकरता टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा ९५९४५३११००, ९७६३४०६५०० या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी केले आहे.