कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्ग जिल्हा शास. निमशासकीय कर्मचारी पतपेढी अध्यक्षपदी प्रसाद कुंटे

03:09 PM May 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

उपाध्यक्षपदी सौ. विनयश्री पेडणेकर

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग, मुख्य कार्यालय कुडाळ अध्यक्षपदी प्रसाद नारायण कुंटे व उपाध्यक्षपदी सौ. विनयश्री हरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदर पतपेढी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व विभागातील शासकीय निमशासकीय कर्मचारी सभासद आहेत. सर्व शासकीय निमशासकीय विभागातील कर्मचारी सभासद समाविष्ट करणारी ही सिंधुदुर्ग जिल्हयातील संस्था आहे. संस्थेची सन 2025/26 ते सन 2030/31 ची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल 2025 मध्ये संपन्न झाली. त्यावेळी 14 सदस्यांची बिनविरोध निवड झालेली होती.दि. ०७ मे २०२५ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत साळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड संपन्न झाली. अध्यक्ष पदाासाठी सुचक म्हणून संचालक दिलीप महादेव मसके यांनी प्रसाद नारायण कुंटे यांचे नाव सुचविले तर संचालक शंकर अंकुश चव्हाण यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्ष पदासाठी सुचक म्हणून संचालक मंगेश विठठल राऊत यांनी सौ. विनयश्री हरी पेडणेकर यांचे नाव सुचविले तर संचालक अर्जुन देवु नाईक यांनी अनुमोदन दिले. सदर पदांसाठी एक एकच अर्ज आला असल्याकारणाने सदर निवडीला सर्व संचालकांनी मंजुरी दिल्याने अध्यक्ष म्हणून प्रसाद कुंटे व उपाध्यक्षा म्हणून सौ. विनयश्री पेडणेकर यांची निवडणुक निर्णय अधिकारी श्री. साळगांवकर यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.नूतन अध्यक्ष श्री. कुंटे व उपाध्यक्षा सौ. पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व संचालकांना विश्वासात घेवुन संस्थेचे कामकाज सांभाळणार तसेच आमच्या कारकिर्दीत बांदा या ठिकाणी संस्थेची शाखा चालु करण्याच्या दृष्टीने देखील नियोजन करुन त्याची कार्यवाही करु. यावेळी उपस्थित नुतन संचालक श्री. संजय गावडे, श्री. वसंतराव पाटोळे, श्री. राजेश कुडाळकर, श्री. दिलीप मसके, श्री. मंगेश राऊत, श्री. अर्जुन नाईक, श्री. दिनकर केळकर, श्री. लक्ष्मण वळवी, श्री. शंकर चव्हाण, श्री. शामराव बिरादार, श्री. हेमंत सावंत, श्री. प्रज्योत सावंत, तसेच श्री. आनंद परुळेकर, श्री. उदय शिरोडकर, श्री. सुंदर म्हापणकर, श्री. नितीन जठार, सचिव श्री. रामचंद्र दळवी व कर्मचारी वृंद यांनी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article