For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धेत कुडाळचे प्रसाद खानोलकर प्रथम

12:12 PM Jan 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
राज्यस्तरीय कथा लेखन स्पर्धेत कुडाळचे प्रसाद खानोलकर प्रथम
Advertisement

प्रबोधन गोरगांव व साप्ताहिक मार्मिक आयोजित स्पर्धा

Advertisement

वेंगुर्ले/भरत सातोस्कर
प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-गोरेगाव यांनी आयोजित केलेल्या कथा स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी दि. ११ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता मुंबई- गोरेगाव येथील जवाहरनगर सभागृह येथे संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्त डॉ. संजय उपाध्ये यांचा 'मन करा रे प्रसन्न' हा कार्यक्रम ठेवला होता.या कथा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयातील कुडाळचे सुपुत्र प्रसाद खानोलकर यांच्या 'चंद्रफुल' कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लेखक प्रसाद खानोलकर यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत हे मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिकचे वार्षिक सभासतदत्व, साप्ताहिक मार्मिक अंक आणि रोख रु. ११०००/- असा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेचा पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई-गोरेगाव येथील जवाहरनगर सभागृह येथे शनिवारी संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत प्रमुख पाहुणे दैनिक नवशक्तीचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला. यावेळी माजी उद्योग मंत्री आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई, प्रबोधन गोरेगाव संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद (विज) गावडे अध्यक्ष नितीन शिंदे आणि साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर आदींचा समावेश होता.प्रबोधन गोरेगाव आणि साप्ताहिक मार्मिक आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-गोरेगाव यांनी आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत क्रमांक निहाय विजेत्या कथा, लेखक आणि पुरस्काराचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे.प्रथम क्रमांक 'चंद्रफूल' लेखक प्रसाद खानोलकर (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिक अंकाचे १ वर्षाच मोफत सभासदत्व आणि रोख रु. ११०००/-), द्वितीय क्रमांक- 'अ फ्रेंड इन नीड' लेखक अशोक गोवंडे, (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिक अंकाचे १ वर्षाचे मोफत सभासदत्व आणि रोख रु. ५०००/-), तृतीय क्रमांक- 'अंतर्धान' लेखक अमित पंडित (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिक अंकाचे १ वर्षाचे मोफत सभासदत्व आणि रोख रु.३०००/-), उत्तेजनार्थ 'शोध' लेखक श्रीमती मंगल कातकर (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिक अंकाचे १ वर्षाचे सभासदत्व आणि रोख रु. २५००/-), उत्तेजनार्थ 'माझी रोबॉटिक मुलाखत 'लेखक श्री सुरेशचंद्र (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिक अंकाचे १ वर्षाचे सभासदत्व आणि रोख रु. २५००/-), उत्तेजनार्थ-नावात काय आहे लेखक नवनाथ गायकर (मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, साप्ताहिक मार्मिक अंकाचे १ वर्षाचे सभासदत्व आणि रोख रु. २५००/-) असे आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.