हातकणंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रसाद जाधव ,स्वरद गिरीगोसावी, सिद्धेश जगदाळे प्रथम
घुणकी प्रतिनिधी
हातकणंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग विद्यार्थी गटात प्रसाद जाधव याचे फ्री एनर्जी फ्रॉम रोड, उच्च प्राथमिक स्तर विद्यार्थी गटात स्वरद गिरीगोसावी याचे मल्टीपर्पज जीप, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर विद्यार्थी गटात सिद्धेश जगदाळेचे दंतकर्ण तर अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गटात शरद कुंभार यांचे मल्टीपर्पज मॅथेमॅटिक्स बॉक्स , माध्यमिक शिक्षक गटात प्रदीपकुमार निकम यांचे फिरती प्रयोगशाळा तर प्रयोगशाळा सहाय्यक /परिचर गटात ऋषिकेश इंगळे यांचे थ्री गॅस किट या उपकरणांनी प्रथम क्रमांक मिळवला असून या उपकरणांची रयत गुरुकुल कुंभोज या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे .
किणी हायस्कूल किणी येथे ५१ वे हातकणंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले .किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .याप्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड व गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक बी. डी . मलगुंडे यांनी केले तर पर्यवेक्षक डी . डी . चव्हाण यांनी आभार व्यक्त केले .
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
दिव्यांग विद्यार्थी गट
प्रसाद जाधव , पाराशर हायस्कूल पारगाव - फ्री एनर्जी फ्रॉम रोड - प्रथम
उच्च प्राथमिक स्तर विद्यार्थी गट (इ. ६ वी ते ८ वी )
स्वरद गिरीगोसावी, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल पेठवडगाव - मल्टीपर्पज जीप - प्रथम , कार्तिक रामचंद्र खोत, खोतवाडी हायस्कूल खोतवाडी - जीवरक्षक उपकरण - द्वितीय , रेहान हुसेन कमते जम्बूकुमार हुल्ले प्राथमिक विद्यालय रुई - रोबो कार - तृतीय
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर विद्यार्थी गट (इ. ९ वी ते १२ वी )
सिद्धेश जगदाळे ,पाराशर हायस्कूल पारगाव - दंतकर्ण - प्रथम, साबीर लियाकत नालबंद , विजयादेवी यादव इंग्लिश स्कूल पेठवडगाव - आयओटी वेट मॉनिटरिंग - द्वितीय , राव शाहरुखखान रज्जाक मोहम्मद , खोतवाडी हायस्कूल खोतवाडी - पाणीपुरवठ्यातील सुलभता - तृतीय
अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गट -
शरद राजाराम कुंभार , कुमार विद्यामंदिर तारदाळ - मल्टीपर्पज मॅथेमॅटिक्स बॉक्स - प्रथम , संतोष सदाशिव पाच्छापुरे - कन्या विद्या मंदिर हुपरी नं . १ , बहुउद्देशीय गणित साहित्य - द्वितीय , संदीप वसंत घोडके, चावरे माध्यमिक विद्यालय चावरे- नवभौतिकीय प्रयोगशाळा - तृतीय
अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य माध्यमिक शिक्षक गट
प्रदीपकुमार भीमराव निकम ,चावरे माध्यमिक विद्यालय चावरे - फिरती प्रयोगशाळा - प्रथम , प्रियांका बाळासो पवार , आदर्श विद्यानिकेतन मिणचे - रेझिस्टर - द्वितीय , दादासो अण्णा सरडे एम .जी . शहा विद्यामंदिर बाहुबली - बहुउद्देशीय भौमितिक साहित्य - तृतीय
प्रयोगशाळा सहाय्यक /परिचर गट
ऋषिकेश किसन इंगळे , वारणा विद्यानिकेतन पारगाव - थ्री गॅस किट - प्रथम , वैशाली शशिकांत कुरणे , श्री रामराव इंगवले हायस्कूल हातकणंगले - वनस्पती प्रकाश संश्लेषण -द्वितीय , अण्णासाहेब गोविंद शिंदे , नरंदे हायस्कूल नरंदे - टाकाऊ पासून टिकाऊ - तृतीय
सर्व गटातील प्रथम क्रमांक तसेच उच्च प्राथमिक स्तर तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर या विद्यार्थी गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या उपकरणांची रयत गुरुकुल कुंभोज या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे .
हातकणंगलेचे गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील , शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी बोरचाटे, किणी हायस्कूलचे मुख्याध्यापक बी.डी . मलगुंडे ,पर्यवेक्षक डी .डी . चव्हाण , हातकणंगले विज्ञान समितीचे अध्यक्ष डॉ . सचिन कोंडेकर, प्रदीप निकम , सागर चुडाप्पा आदींनी विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले .