ॲमॅच्युअर कबड्डी फेडरेशनच्या व्हाईस प्रेसिडेंटपदी प्रसाद अरविंदेकर
सावंतवाडी । प्रतिनिधी
जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर याची ॲमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (एके एफ आय AKFI)या संस्थेवर व्हाईस प्रेसिडेंट पदी नियुक्ती झाली आहे. दिनांक 23 डिसेंबर रोजी ॲमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया सन 2023 ते 27 या कार्यकरिणीची निवडणूक प्रक्रिया न्यू दिल्ली येथे कन्स्तिशन क्लब मध्ये पार पडली .त्यामध्ये 28 राज्य व आठ केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. निवडणूक प्रक्रिया तेलंगणा ,आंध्राचे रिटायर्ड जस्टीस डीएसआर वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये महाराष्ट्रातून श्री. प्रसाद अरविंदेकर यांची एकेएफआय या संस्थेवर व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली. तशी घोषणा जस्टीस डी. एस . आर. वर्मा यांनी जाहीर केली. निवड होताच ॲमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया AKFI चेअरमन आनंद चव्हाण ,अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, एक. के . एफ. आय चे सेक्रेटरी उशी रेड्डी , दिल्लीचे राधेश्याम सैनी व वर्ल्ड कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष ढोरजी लांबा, नेपाळचे सेक्रेटरी भक्ता संजू यांनी अभिनंदन केले.
प्रसाद अरविंदेकर हे सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात अनेक वर्ष काम करतात. कबड्डी खेळाडू घडवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे . त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.