For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रणाली येरम यांना फार्मास्युटिकल सायन्सेस मध्ये पी.एच.डी

03:22 PM Jun 16, 2026 IST | अनुजा कुडतरकर
प्रणाली येरम यांना फार्मास्युटिकल सायन्सेस मध्ये पी एच डी
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

वेंगुर्ले शहर कँम्प येथील सुकन्या डॉ. प्रणाली उर्मिला बुधाजी येरम यांनी फार्मास्युटिकल सायन्सेस (Pharmaceutical Sciences) या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी रत्नागिरी येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी मधून बी.फार्मसी पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी जीपॅट (GPAT) ग्रँज्युएट फाँर्मसी अँप्टीट्युड टेस्ट परीक्षा उत्तीर्ण केली आणि मुंबई येथील प्रिन्सिपल के. एम. कुंदानी काँलेज आँफ फार्मसी Prin. K. M. Kundnani College of Pharmacy मधून एम.फार्मसी पदवी संपादन केली. एम.फार्मसी चे शिक्षण त्यांनी फेलोशिपच्या माध्यमातून पूर्ण केले.त्यानंतर त्यांनी SVKM's नर्सी मोनजी इन्स्टिट्यूट आँफ मँनेजमेंट स्टँडीज Narsee Monjee Institute of Management Studies (NMIMS) विद्यापीठाच्या शोभाबेहन प्रतापभाई पटेल स्कुल आँफ फाँर्मसी अँण्ड टेक्नॉलॉजी मँनेजमेंट (SPPSPTM), मुंबई येथून फार्मास्युटिकल सायन्सेस विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. पीएच.डी. शिक्षणादरम्यान त्यांना विद्यापीठाची प्रतिष्ठित डॉक्टरेट फेलोशिप प्राप्त झाली होती.त्यांचे संशोधन ‘क्रॉनिक किडनी डिसीज’ (CKD) या महत्त्वपूर्ण विषयावर आधारित असून त्यांनी या क्षेत्रातील संशोधनपर लेख उच्च प्रभावांक असलेल्या "आंतरराष्ट्रीय संशोधन" या नियतकालिकांमध्ये प्रकाशित केले आहेत. हे संशोधन त्यांनी डॉ. अमिशा वोरा, असोसिएट प्राध्यापक, SPPSPTM तसेच डॉ. योगेश कुलकर्णी, प्राध्यापक व असोसिएट डीन, SPPSPTM, NMIMS, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केले.सध्या डॉ. प्रणाली उर्मिला बुधाजी येरम या SPPSPTM, नवी मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मोलाचे योगदान देत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.