प्रणव मुखर्जी व्हायला हवे होते पंतप्रधान
मनमोहन राष्ट्रपती व्हायला हवे होते : मणिशंकर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी स्वत:च्या नव्या पुस्तकात 2012 मये राष्ट्रपती पद रिक्त झाले असता प्रणव मुखर्जी यांना संपुआ-2 सरकारची धुरा देणे योग्य ठरले असते असे नमूद पेले आहे. तेव्हा मनमोहन सिंह यांना राष्ट्रपती केले जायला हवे होते असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यावेळी अशाप्रकारचे निर्णय घेण्यात आले असते तर संपुआ सरकार धोरणलकव्याच्या स्थितीत पोहोचले नसते. मनमोहन सिंह यांना पंतप्रधानपदी कायम ठेवणे आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती भवनात पाठविण्याच्या निर्णयामुळे तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची शक्यताच संपुष्टात आल्याचा दावा मणिशंकर यांनी पुस्तकात केला आहे.
अय्यर यांनी स्वत:चे पुस्तक ‘अ मॅवरिक इन पॉलिटिक्स’मध्ये हे दावे केले ाहेत. पुस्तकात अय्यर यांनी स्वत:चे राजकारणातील प्रारंभिक दिवस, माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे शासन, संपुआ-1 मधील मंत्रिपदाचा कार्यकाळ, राज्यसभेतील कार्यकाळ आणि मग स्थितीतील घसरण, राजकीय सारिपाटावरून दूर होणे राजकारणी म्हणून पतनाचाही उल्लेख केला आहे.
2021 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना अनेकदा ‘कोरोनरी बायपास सर्जरी’ करवून घ्यावी लागली. ते शारीरिक स्वरुपात कधीच पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकले नाहीत. यामुळे त्यांचा काम करण्याचा वेग मंदावला आणि याचा प्रभाव शासनावरही पडला. पंतप्रधानांची प्रकृती बिघडली त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी देखील आजारी पडल्या होत्या. परंतु पक्षाने त्यांच्या आरोग्याविषयी कुठलीच अधिकृत घोषणा केली नसल्याचे अय्यर यांनी नमूद केले आहे.
लवकरच पंतप्रधान अन् पक्षाध्यक्ष कार्यालयातील कामाचा वेग मंदावला असल्याचे स्पष्ट झाले. अनेक संकटं विशेषकरून अण्णा हजारेंच्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनाला प्रभावीपणे हाताळले गेले नाही. 2012 मध्ये राष्ट्रपती पद रिक्त झाल्यावर प्रणव मुख्घर्जी यांना सरकारची धुरा सोपविली जाणे योग्य ठरले असते. तर डॉ. मनमोहन सिंह यांना देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले जायला हवे होते असे मत अय्यर यांनी व्यक्त केले आहे.