For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाळवंटी नदीच्या संवर्धनाचा मुख्यमंत्र्यांकडून संकल्प; विठ्ठलापूर साखळीत नदीपूजन; जागतिक नदी दिनानिमित्त डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आरती; नद्या प्रदूषणमुक्त ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

10:33 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
वाळवंटी नदीच्या संवर्धनाचा मुख्यमंत्र्यांकडून संकल्प  विठ्ठलापूर साखळीत नदीपूजन  जागतिक नदी दिनानिमित्त डॉ  प्रमोद सावंत यांनी केली आरती  नद्या प्रदूषणमुक्त ठेवण्याचे नागरिकांना आवाहन
Advertisement

साखळी : जागतिक नदी दिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विठ्ठलापूर, साखळी येथील वाळवंटी नदीचे पूजन करून आरती केली. यावेळी त्यांनी नदीच्या संवर्धनाचा संकल्प करत राज्यातील नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन केले. विठ्ठलापूर साखळी येथे वाळवंटी नदीकिनारी विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा असल्याची नोंद सरकारी माहितीतही आहे.

Advertisement

राज्यातील नद्या या केवळ जलस्रोत नसून पर्यावरण आणि मानवी जीवनाचा महत्त्वाचा आधार आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.

‘नदी आपल्या हातून प्रदूषित होणार नाही’, असा संकल्प त्यांनी यावेळी केला. नदीचे संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका पार पाडणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

नद्यांमध्ये कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे तसेच अन्य प्रकारे प्रदूषण करणे टाळून नदीचे नैसर्गिक स्वरूप जपण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. वाळवंटी नदीच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Advertisement
Tags :

.