For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

2027 मध्येही मीच मुख्यमंत्री असेन!; डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वासपूर्ण दावा

09:17 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
2027 मध्येही मीच मुख्यमंत्री असेन   डॉ  प्रमोद सावंत यांचा विश्वासपूर्ण दावा
Advertisement
पणजी : 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतरही गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी आपणच कायम राहणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेच्या उद्घाटनालाही आपणच उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मिरामार येथे रविवारी आयोजित आयर्नमॅन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

गोव्यात आयर्नमॅन स्पर्धेचे यंदा सहावे वर्ष असून, या स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान आपल्याला मिळाला आहे. ही स्पर्धा पुढील वर्षीही गोव्यात आयोजित केली जाणार असून, तिचे उद्घाटन आपणच करणार असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या विधानातून 2027 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

Advertisement

दरम्यान, डॉ. सावंत यांचा हा दावा प्रत्यक्षात कितपत खरा ठरणार, हे 2027 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यानंतरच्या सत्तास्थापनेनंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.