For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी- 20 लीगचे प्रमोद कदम प्रमुख पुरस्कर्ते

09:56 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
टी  20 लीगचे प्रमोद कदम प्रमुख पुरस्कर्ते
Advertisement

बेळगाव : बेळगावात प्रथमच प्रकाशझोतात होणाऱ्या युनियन जिमखाना आयोजित टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख पुरस्कर्ते म्हणून उद्यमबाग येथील प्रसिद्ध उद्योजक सिद्धेश्वर ग्रॅनाईटचे मालक प्रमोद कदम बनले आहेत. प्रमोद कदम यांनी मुख्य प्रायोजकत्व स्वीकारल्याने स्पर्धेचे नामकरण सिद्धेश्वर ग्रॅनाईट बेळगाव टी-20 लीग स्पर्धा असे करण्यात आले आहे. प्रमोद कदम हे ग्रॅनाईट व्यवसायिक असून स्वत: ग्रॅनाईटचे उत्पादन घेतात. त्यांच्या कारखान्यात उत्पादन होणाऱ्या ग्रॅनाईटला बेळगाव तसेच संपूर्ण भारत व भारताबाहेरही मागणी असून त्यांचे ग्रॅनाईट निर्यातसुद्धा होते. युनियन जिमखाना येथे पार पडलेल्या एक कार्यक्रमात सिद्धेश्वर ग्रॅनाईटचे मालक प्रमोद कदम यांचा सत्कार युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर व उपाध्यक्ष संजय पोतदार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमोद कदम यांचे चिरंजीव क्रिकेटपटू रोहन कदम व दीपक राजूकर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.