For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रमोद गावडेंच्या अपक्ष अर्जाने तळवडे मतदारसंघात पक्षनेतृत्वाला आव्हान

04:51 PM Jan 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
प्रमोद गावडेंच्या अपक्ष अर्जाने तळवडे मतदारसंघात पक्षनेतृत्वाला आव्हान
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे विद्यमान चेअरमन तथा निरवडे गावचे माजी सरपंच प्रमोद गावडे यांनी आज जिल्हा परिषद तळवडे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षनेतृत्वाला उघड आव्हान दिले आहे.पक्षाने स्थानिक उमेदवाराला डावलून बाहेरचा उमेदवार लादल्याचा आरोप करत गावडे यांनी बंडाचे निशाण फडकवले असून यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तळवडे मतदारसंघात संदिप गावडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत होता.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रमोद गावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले की,या निवडणुकीत तळवडे,मळगाव,नेमळे आणि निरवडे यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या गावांतील सक्षम स्थानिक नेतृत्वावर अन्याय करण्यात आला आहे.या भागातील जनतेच्या भावनांचा विचार न करता बाहेरचा उमेदवार लादण्यात आल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.हा अन्याय सहन न करण्याचा भावनेतूनच आपण अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी सांगितले.प्रमोद गावडे यांची ओळख आजवर एक कट्टर राणे समर्थक अशी राहिली आहे.मात्र पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या अपमानामुळे त्यांना हे पाऊल उचलावे दागले आहे. माझी ही लढाई कोणा व्यक्तीच्या विरोधात नसून ती एका विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आहे.आणि या प्रवृत्तीचा पराभव करण्यासाठी मी शेवटपर्यत लढवणार असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.गावडे यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून येणाऱ्या काळात या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.