For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धारवाडमध्ये प्रल्हाद जोशी सलग पाचव्यांदा विजयी

10:30 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
धारवाडमध्ये प्रल्हाद जोशी सलग पाचव्यांदा विजयी
Advertisement

काँग्रेसच्या विनोद असुटींवर 97,324 मतफरकाने मात

Advertisement

बेंगळूर : लोकसभा निवडणुकीत धारवाड लोकसभा मतदारसंघांवरील वर्चस्व अबाधित राखण्यात भाजप पक्ष यावेळीही यशस्वी ठरला आहे. येथील भाजपचे उमदेवार केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पाचव्यांदा लोकसभेत प्रवेश केला आहे. प्रल्हाद जोशी यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विनोद असुटी यांना 97,324 मतांच्या फरकाने पराभूत केले आहे. प्रल्हाद जोशी यांना 7,16,231 तर पराभूत उमेदवार विनोद असुटी यांना 6,18,907 मते पडली आहेत. प्रल्हाद जोशी यांनी 2005, 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग पाच लोकसभा निवडणुकांमध्ये एकतर्फी विजय मिळविला आहे. 19096 पासून या मतदारसंघावर भाजपची पकड आहे. धारवाड जिल्ह्यातील 8 पैकी प्रत्येकी 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप, काँग्रेसचे आमदार आहेत. तरी सुद्धा मोठ्या मताधिक्क्याने भाजपचा उमेदवार लोकसभेवर निवडून आला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.