प्रकाश करात यांना पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी
माकप पॉलिट ब्युरो-केंद्रीय समितीच्या अंतरिम समन्वयकपदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात हे पक्षाच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे अंतरिम समन्वयक होणार आहेत. पुढील वर्षी एप्रिलमध्ये पक्षाचे 24 वे संमेलन आयोजित होईपर्यंत ते ही जबाबदारी सांभाळतील अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली. माकप महासचिव सीताराम येच्युरी यांचे 12 सप्टेंबर रोजी निधन झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्लीत पार पडलेल्या माकपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रकाश करात हे एप्रिल 2025 मध्ये मदुराई येथे 24 वी पार्टी काँग्रेस आयोजित होईपर्यंत अंतरिम व्यवस्था म्हणून पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचे समन्वयक असणार आहेत.
माकपच्या सर्वात वरिष्ठ नेत्यांपैकी एक प्रकाश करात हे 2005-15 पर्यंत पक्षाचे महासचिव राहिले आहेत. 1985 मध्ये ते केंद्रीय समितीसाठी निवडले गेले होते आणि 1992 मध्ये पॉलिट ब्युरोचे सदस्य झाले हेते. पॉलिट ब्युरोचे पक्षाचे प्रमुख निर्णय घेत असतो.