For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : प्रकाश भिवंदे यांची प्रचारात जोरदार आघाडी

04:44 PM Feb 04, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news   प्रकाश भिवंदे यांची प्रचारात जोरदार आघाडी
Advertisement

                                घरोघरी प्रचार करत मतदारांच्या थेट संपर्कात प्रकाश भिवंदे

Advertisement

राजापूर : राजापूर तालुक्यातील जुवाठी पंचायत समिती गणामध्ये अपक्ष उमेदवार प्रकाश भिवंदे घरोघरीजाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत असून त्यांना मतदारांकडूनही चांगला प्रतिसाद लाभत आहे. गेली 25 वर्षे आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आहोत. माझ्या परीने जुवाठी पंचक्रोशीतच नाही तर अन्य भागातील सर्वसामान्य जनतेची कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामुळे संपूर्ण गणातील जनता आपल्या पाठीशी असून आपला विजय निश्चित असल्याचा दावा भिवंदे यांनी केला आहे.

भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते व एक यशस्वी व्यावसायिक अशी ओळख असलेले प्रकाश भिवंदे हे जुवाठी पंचायत समिती गणातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पक्षाकडे त्यांनी तिकीटाची मागणी केली होती. मात्र महायुतीत हा गण शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. या भागातील जनतेचा आग्रह व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ यामुळे ते या गणातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

Advertisement

एक अभ्यासू आणि त्या भागातील प्रश्नांची व जनतेच्या समस्यांची जाण असलेले नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी भाजपकडून पूर्वीच्या केळवली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली होती, मात्र त्यावेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते असलेल्या भिवंदे यांची या भागातील जनतेशी नाळ जोडलेली आहे. कायमच या भागातील जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या भिवंदे यांनी कधी पक्षाच्या माध्यमातून तर कधी वैयक्तिकरित्या या भागातील विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी काम केले.

या भागात त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. तर या भागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही त्यांच्यासाठी काम करत आहेत. रविवारी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जुवाठी गावातील एका प्रचारसभेत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या सभेत भिवंदेना पाठिंबा असल्याचे ठासून सांगत बैठकीला विरोध केला. त्यामुळे ती बैठक गुंडाळावी लागली. प्रचाराच्या माध्यमातून भिवंदे यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांया गाठीभेटी घेतल्या असून मतदारांकडूनही त्यांचे स्वागत होत आहे. या भागातील जनतेच्या विकासासाठी आपण ही निवडणूक लढवत असून जनतेचा मिळणार पाठिंबा आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळे माझा विजय निश्चित असल्याचे भिवंदे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :

.