For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ratnagiri News : लोकआग्रहास्तव जुवाठी गणातून प्रकाश भिवंदे निवडणूक रिंगणात

05:26 PM Feb 02, 2026 IST | NEETA POTDAR
ratnagiri news   लोकआग्रहास्तव जुवाठी गणातून प्रकाश भिवंदे निवडणूक रिंगणात
Advertisement

                          प्रकाश भिवंदे जुवाठी पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार

Advertisement

राजापूर : गेली २५ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात काम करताना जनतेला बरोबर घेऊन पंचायत समिती गणात अनेक विकास कामे मार्गी लावणारे भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश भिवंदे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जुवाठी पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून टेबल निशाणी घेवून श्री.भिवंदे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. केवळ लोकआग्रहास्तव जुवाठी गणाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे भिवंदे यांनी सांगितले.

मागील अनेक वर्षांपासून भिवंदे यांनी जनतेच्या विविध प्रश्नांवर आपले काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासासाठी भाजपाच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. खासदार नारायण राणे व भाजपाच्या अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली जुवाठी पंचायत गणात छोट्या-मोठ्या अनेक समस्या त्यांनी मार्गी लावल्या आहेत. यामुळे केवळ निवडणूक आली की जनतेजवळ न पोहचता सुरुवातीपासूनच त्यांचा या गटातील प्रत्येक गाव-वाडी यांच्याजवळ दांडगा संपर्क राहिला आहे.

Advertisement

उद्योग व्यवसायातून अनेकांची खाजगी कामे केली आहेत. रस्ते, पाणी या समस्यांवर काम करताना अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कोविड काळात आवश्यक औषध पुरवठा, जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याचे काम केले आहे. शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना सहकार्याचा हात दिला. लोकांनीच आग्रह धरला असल्याने आपण या निवडणूकीत उडी घेतल्याचे श्री.भिवंदे यांनी सांगितले. गेली वीस वर्षांहून अधिक काळ श्री. भिवंदे हे भाजपाचे काम करत आहेत. सध्याच्या राजकीय क्षेत्रात सातत्याने पक्ष बदल होत असताना भिवंदे यांच्याकडे मात्र आजही भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून पाहीले जात आहे.

प्रत्येक त्यांनी मदतीचा हात दिल्याने गणात 'आपला माणूस' म्हणून पाहीले जात आहे. मतदार संघात त्यांनी चांगली बांधणी केली आहे. मतदारांसमोर जाताना त्या त्या गावातील नियोजनबद्ध विकासाचा आराखडा ते समोर ठेवत आहेत. प - त्येक गावातून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. प्रकाश भिवंदे यांच्या प्रचारात सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

Advertisement
Tags :

.