Ratnagiri News : लोकआग्रहास्तव जुवाठी गणातून प्रकाश भिवंदे निवडणूकीच्या रिंगणात
जुवाठी पांयत समितीमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राजापूर : गेली 25 वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व उद्योग क्षेत्रात काम करताना जनतेला बरोबर घेऊन पांयत समिती गणात अनेक विकास कामे मार्गी लावणारे भाजपो निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश भिवंदे यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जुवाठी पांयत समिती गणातून ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. टेबल निशाणी घेवून भिवंदे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. केवळ लोकआग्रहास्तव जुवाठी गणाया सर्वांगिण विकासासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्यो भिवंदे यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षांपासून भिवंदे यांनी जनतेच्या विविध प्रश्नांवर आपले काम अविरतपणे सुरू ठेवले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातील विकासासाठी भाजपच्या माध्यमातून त्यांनी काम केले आहे. खासदार नारायण राणे व भाजपाया अनेक नेत्यांया नेतृत्वाखाली जुवाठी पांयत गणात छोटÎा-मोठÎा अनेक समस्या त्यांनी मार्गी लावल्या आहेत. यामुळे केवळ निवडणूक आली की जनतेजवळ न पोहोचता सुरुवातीपासूनच त्यांचा या गटातील प्रत्येक गाव-वाडी यांच्याजवळ दांडगा संपर्क राहिला आहे.
उद्योग व्यवसायातून अनेकीं खासगी कामे केली आहेत. रस्ते, पाणी या समस्यांवर काम करताना अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कोविड काळात आवश्यक औषध पुरवठा, जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याचे काम केले आहे. शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना सहकार्याचा हात दिला. लोकांना आग्रह धरला असल्याने आपण या निवडणूकीत उडी घेतल्यो भिवंदे यांनी सांगितले. गेली वीस वर्षांहून अधिक काळ ते भाजपो काम करत आहेत. सध्याया राजकीय क्षेत्रात सातत्याने पक्ष बदल होत असताना भिवंदे यांयाकडे मात्र आजही भाजपो निष्ठावंत कार्यकर्ते आणि ‘आपला माणूस’ म्हणून पाहिले जात आहे. मतदार संघात त्यांनी चांगली बांधणी केली आहे. मतदारांसमोर जाताना त्या त्या गावातील नियोजनबद्ध विकासाचा आराखडा ते समोर ठेवत आहेत. प्रत्येक गावातून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सर्वत्र त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. प्रकाश भिवंदे यांया प्रारात सर्वा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.